रविंद्र कुवेसकर, प्रतिनीधी
माणगाव : दि.११- माणगांवात आज शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अंशतः ढगाळ वातावरणात माणगाव येथे ४० अंश सेल्सियस तापमानात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अगोदरच कोरोना संकटाचे सावट सर्वत्र पसरले असून एकंदरीत विचीत्र हवामानाचा फटका पुन्हा एकदा बसला आहे.
अचानक पडलेल्या पावसाच्या सरीने गावाकडची रणरणत्या उन्हात तप्त झालेली लाल जमिन आणि त्या तप्त लाल मातीवर पडलेली पावसाची सर, या मुळे गावच्या परिसरात मातीचा सुगंध दरवळत होता. पडलेल्या पावसाने उष्णता आणखीन वाढली आहे. विचीत्र हवामान झाले असून नागरिक हैराण आहेत.
तालुक्यातील बागायती पिकांचे संभाव्य नुकसान होऊ शकते. यंदा हापूसचा आंबा गावाकडे अजुनही बाजारात आलेला नाही. कोरोना संकटामुळे सगळेच हवालदील झालेले आहेत. अशातच पाऊस पडला तर म्हणतात काही लोक आंबा खात नाहीत. बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून शासनाला आता याकडे लक्ष वेधावे लागणार आहे.
दुष्काळात तेरावा अशी जनमाणसाची बिकट अवस्था झाली आहे. या अवकाळी पावसाने उष्णता प्रचंड वाढली असून अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. माणगांव येथे आजचे तापमान उष्णता कमाल ४०॰ तर किमान २६॰ असून पर्जन्य ०॰ नोंदले गेले आहे आकाश अंशतः ढगाळ राहणार असून पुढील आठवड्यातही ४०॰ तापमानाचा अंदाज गुगलवर वर्तविण्यात येत आहे. हे सगळे माणसाने पर्यावरणाच्या केलेल्या ऱ्हासाचे विपरित परिणाम असल्याचेही नागरिकांमधुन बोलले जात आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews

0 टिप्पण्या