राहुल फुंदे, प्रतिनीधी
शिर्डी : दि १२ - साईबाबा संस्थानकडे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा पाच तारखेला होतो. मात्र मार्च महिन्याचा पगार 5 तारीख उलटूनही झाला नाही आठवड्या पुर्वीच पगार होणे अपेक्षित असतानाही एप्रिलची 11 तारीख उलटूनही तो झाला नसल्याने कोरोणाच्या या महामारीचे संकटकाळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना सोसण्याची वेळ आली आहे.संस्थाने प्रशासनाने याकडे लक्ष घालून वेळीच पगार करावे अशीच चर्चा कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला पाच ते सहा तारखेला होणारा पगार दोन आठवडे उलटूनही न झाल्याने सुमारे तीन-साडेतीन हजार कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्न निर्माण झाला. त्या पगारात भागत नसल्याने अनेकांचे कुटुंबिय शेती व्यवसाय अथवा शेतीपूरक व्यवसाय करून कुटुंबांची आर्थिक गरज भागवायचे पंरतु हे व्यवसाय सुद्धा कोरोणाच्या महामारीत कोंडीत सापडून मोडीत निघाल्याने चांगलीच पंचाईत झाली आहे परिणामी काहींची उपासमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोणाच्या यामहामारीत दररोजचा खर्च सारखा वाढत असून खिशाला मोठी झळ बसत आहे त्यातच पगार न झाल्याने खिशात दमडी शिल्लक राहीली नसल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. मात्र संस्थान पगार करत नाही या कैचीत अनेक जण सापडल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्यांना ड्युटीवर याव जावं लागतं त्या कर्मचाऱ्यांचा पेट्रोल खर्च पण मोठा आहे.
त्याचप्रमाणे सध्या स्वच्छता व आरोग्यविषयक काळजी घेताना अतिरिक्त खर्च प्रत्येक कुटुंबात व व्यक्तीचा वाढला असल्याने घराघरातील आर्थिक बजेट कोलमडले आहेत अशातच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा होणारा पगार अजूनही न झाल्याने पगार केव्हा होईल याच प्रतीक्षेत आऊटसोर्सिंग व इतल कर्मचारी आहे कायम सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले आहेत मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार अजून झाले नाहीत हे पगार रखडले याबाबत वेग वेगळे तर्क वितर्क बोलले जात आहेत.
संस्थान प्रशासनाने ठेकेदाराला कंत्राटी कर्मचार्यांचे पगार लवकर करण्यास भाग पाडावे व कर्मचाऱ्यांना कोरोणाच्या या महामारीच्या संकटात आर्थिक दिलासा व आधार द्यावा अशी अपेक्षा आता कर्मचाऱ्यांनी मधून व्यक्त होत आहे. मात्र पगार लवकरच करावा अशी मागणी निलेश दादा कोते , विशाल भंङागे, अमित शेळके दिपक गोंदकर ( मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवककाँग्रेस) प्रकाश गोंदकर यांनी केले आहे.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Ahmednagar #Shirdi#Maharashtranews

0 टिप्पण्या