भ्रष्टाचार, मुलींवरील अत्याचार सारख्या घटना थांबण्यासाठी कर्नाटक ते दिल्ली पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी युवतीची पायी यात्रा

 भ्रष्टाचार, मुलींवरील अत्याचार सारख्या घटना  थांबण्यासाठी कर्नाटक ते दिल्ली पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी युवतीची पायी यात्रा


पोलिस प्रवाह न्युज

करमाळा (सोलापूर) - दि. ५- मनामध्ये देशभक्तीचा भाव असणारी कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील तरुण युवती मंजुळा वय २९ वर्ष हीने गेली १२  दिवसापासून तिच्या मूळ गावापासून  दिल्लीच्या दिशेने चक्क पायी यात्रा सुरू केलेली आहे. हातामध्ये  डिजिटल बॅनर घेऊन ही युवती रखरखत्या उन्हात पायी चालत मजल दरमजल करत रोज एका गावामध्ये ठराविक अंतरावरती मंदिराच्या ठिकाणी आसरा घेत् दिल्लीच्या दिशेने निघालेली आहे .

या युवती चे ध्येय एकच आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे. देशातला भ्रष्टाचार, लहान चिमुकल्या मुलींवरती होणारा अत्याचार, महिलांवरील बलात्कार, बेरोजगारी हे प्रश्न सोडविण्यासाठी चक्क दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेण्यासाठी निघालेली आहे .

तहान भुकेची तमान बाळगता रखरखत्या उन्हात ही युवती पायी चालत आहे.तिला देशाच्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की, मी दिल्लीत जाऊन त्यांना भेटल्यानंतर देशातील या समस्यांचे निरसन होईल आणि मोदी यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करतील. माझ्या अंगात फक्त देशभक्ती सळसळत असून मी माझ्या कुटुंबाचा त्याग करून माझ्या दोन चिमुकल्या मुलींना घरी कुटुंबाच्या ताब्यात देऊन स्वतःच्या जीवाची परवा न करता मी पायी यात्रा करत  दिल्लीला निघालेली  आहे. 

कर्नाटक रायचूर ते दिल्ली तबबल 1790 किलोमीटरचा प्रवास आहे.पुढे बोलताना ती युवती म्हणाली की, माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच देह आहे. की मी एवढा हजाराें  किलोमीटर चा पायी प्रवास करत दिल्लीला गेल्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट होईल आणि ते या देशातील भ्रष्टाचारी बलात्कारी यांच्यासाठी माझ्यासमोर कठोर कायदयाची  घोषणा करतील .तेव्हाच माझी इच्छा पूर्ण होईल ,आणि माझ्या पायी यात्रेला न्याय मिळेल.

खरोखरच 40° 42 डिग्री अंश सेल्सिअस सारख्या तापमान असलेल्या रखरखत्या उन्हात मंजुळा च्या डोक्यावर साधी टोपीही नाही. पोटात अन्न पाणी नाही. दिवसभर जीवावर बेतणारा हा पायी प्रवास करायचा व रात्र झाल्यावर मंदिराच्या ठिकाणी आसरा घेऊन स्वैच्छने कोणी चटणी भाकरी दिली तर त्यावरच पोट भरायचं . बघणाऱ्यांच्या  डोळ्यात पाणी आणणारा या एकट्या युवतीचाक ठीण पायी प्रवास सुरू आहे. या देशभक्त युवतीच्या पायी यात्रेला यश मिळेल. सरकारने या आगळ्यावेगळ्या लढयाकडे जातीने लक्ष देऊन या देशभक्त युवतीच्या पायी यात्रे ला यश मिळवून द्यावेही जनसामान्याची अपेक्षा आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या