राष्ट्रीय लाईनमन दिन माणगाव उपविभाग येथे संपन्न

 राष्ट्रीय लाईनमन दिन माणगाव उपविभाग येथे संपन्न


पोलिस प्रवाह न्युज

माणगाव - दि. ४- माणगाव येथे राष्ट्रीय लाईनमन दिनाच्यानिमित्त रोहा डिव्हिजन उपविभाग माणगाव येथे  कार्यक्रम संपन्न झाला.  या कार्यक्रमाचे आयोजन उपकार्यकारी अभियंता प्रशांत निकाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थितांना  गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित माणगाव ग्रामीण इंदापूर सहायक अभियंता मयुर भगाले, निजामपूर शहर शाखेचे सचिन गुळवे, माणगाव शहर सहाय्यक अभियंता सनिल करंदेकर, माणगाव उपविभागाच्या वर्षा शहाणे, मोर्बा शाखेचे राहुल नवगणे, फोरमन रविंद्र जाधव, लाईन-मेन तसेच जनमित्र बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उत्तमरीत्या नियोजन करून यशस्वी पार पडण्यासाठी शैलेश तेटगुरे, पाडू दादा व वर्षा शहाणे यांनी मेहनत घेतली. यावेळी उपस्थितांना  सुरक्षा विषायावर मार्गदर्शन लाभले.  चारोळ्या म्हणत कार्यक्रमाची रंगत वाढवली. सर्वांच्या उपस्थित कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार मयूर भगाले यांनी केले. या कार्यक्रमात लाईनमनच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली. लाईनमन हे विद्युत वितरण प्रणालीचा अविभाज्य भाग असून त्यांच्या कार्यामुळे नागरिकांना निरंतर वीजपुरवठा सुनिश्चित होतो. यावर भर देण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून लाईनमनच्या कार्याची जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांनी लाईनमनच्या कार्याचे महत्त्व समजून घेतले आणि त्यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे शेवटी सुरक्षा प्रतिक्षा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या