माणगांवमध्ये आ. निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून ९१ शाळांना डिजिटल साहित्य वाटप.

 माणगांवमध्ये आ. निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून ९१ शाळांना डिजिटल साहित्य वाटप.



पोलिस प्रवाह न्युज 

   माणगाव - २१ -  माणगांवमध्ये दि. २१ मार्च रोजी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधी सन २०२४-२५ मधून रायगड जिल्ह्यातील ९१ शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम माणगांव शहरातील वनवासी कल्याण आश्रम दत्तनगर येथे पार पडला. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील तालुके सुधागड, श्रीवर्धन, रोहा,मुरुड, माणगांव, महाड,पोलादपूर, खालापूर,उरण ,अलिबाग ह्या तालुक्यातील एकूण ९१ शाळा. जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक पूर्ण प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा विद्यालये यांना आ.  निरंजन डावखरे यांच्या पत्नी निलिमा डावखरे यांच्या हस्ते डिजीटल शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये संगणक संच, प्रिंटर, प्रोजेक्टर, एल ई डी शिक्षण किट आदी शैक्षणिक साहित्याचा सामावेश होता.

   या कार्यक्रम प्रसंगी निलिमाताई डावखरे, कोकण विभाग सदस्यता नोंदणी प्रमुख अभिजित पेडणेकर, महाड विधानसभा अध्यक्ष बिपीन म्हामुणकर, सरचिटणीस प्रशांत शिंदे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मंजुषा कुद्रीमोती, प्रदेश चिटणीस यशोधरा गोडबोले, माणगांव तालुकाध्यक्ष गोविंद कासार, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष आशुतोष पाटील, महाड तालुकाध्यक्ष निलेश देवगिरीकर, म्हसळा तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, जिल्हा चिटणीस उमेशजी साटम, युवामोर्चा सरचिटणीस रोशन चाफेकर, तालुका सरचिटणीस जहेंद मुंढे, बाबुराव चव्हाण, योगेश पालकर, तालुका उपाध्यक्ष सुधीर म्हामुणकर, राजू मुंढे, किशोर पवार, सुयश मोने, शिक्षक पतपेढी अध्यक्ष सुर्वे, जंगम गुरुजी, केंद्रप्रमुख शंकर शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रितेश निवाते, शहराध्यक्षा भारती शेठ, राजू तेटगुरे, उमेश यादव, नितीन शेलार, विधिता मेहता, सारिका मेहता, मंदार मढवी, ओमकार गायकवाड,अनिल सत्वे, राहुल धूपकर, नयन खेडेकर,अरुण पेणकर आदी उपस्थित होते.

     या कार्यक्रमात निलिमा डावखरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, भारताचे पाऊल डिजिटल इंडिया कडे जात आहे. यामध्ये कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण कसे मिळेल? याकडे कोकण पदवीधर आ. निरंजन डावखरे सदैव प्रयत्नशील आहेत आणि कटिबद्ध असतील. देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरीकांनी सक्रिय असले पाहिजे. ज्यामुळे आपण बदलणाऱ्या जागतिकीकरणात स्थिर स्थावर होऊ शकू. त्यामुळे डिजिटल इंडियाचा पाया डिजिटल शिक्षण आहे. म्हणुन कोकणातील १००% शाळा ह्या डिजिटल झाल्या पाहिजेत असा आ. निरंजन डावखरे यांचा मानस आहे. तसेच लवकरच कोकणात आणि रायगड मध्ये कौशल्य विकास केंद्र आणि कौशल्य विकास शिबिरांचे आयोजन तसेच कार्यशाळांचे आयोजन देखील आ. निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे देखील निलिमा डावखरे यांनी उपस्थिताना ग्वाही देत सांगितले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या