लोणेरे पंचायत समिती गणात आ. भरत गोगावले यांचा विकास कामांचा धुमधडाका
माणगांव- दि. २२- तालुक्यातील लोणेरे पंचायत समिती गणात शिवसेना नेते विकास पुरुष आ. भरत गोगावले यांच्या माध्यमातून करोडो रुपयांच्या विकास कामांचा धुमधडाका. लोणेरे पंचायत समिती गणात आसा कोणताही गाव नाही, वाडी तिथे आ. भरत गोगावले यांनी काम केले नाही अस नाही. प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्यावर आ. गोगावले यांनी कोट्यवधींची कामे केली आहेत. मुगवली ते कवीलवहाल कोंड रस्ता काँक्रिटीकरण भूमिपूजन, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत भूमिपूजन, तळेगाव येथे शाळागृह व अंगणवाडी इमारत भूमिपूजन, उसरघर वाडी नवघर येथे रस्ता व रक्षण भिंत भूमिपूजन, लोणेरे वाडी नवघर येथे पेव्हरब्लॉक रस्त्याचे उद्घाटन, मांगरुळ जनजीवन मीशन पाणी पुरवठा योजना उद्घाटन, मांगरूळ येथील अंतर्गत रस्ता पेव्हरब्लॉक भूमिपूजन, वाघोसे जनजीवन मीशन पाणी पुरवठा योजना उद्घाटन, वाघोसे अंतर्गत रस्ता उद्घाटन, खडकोळी शिवाजीनगर अंतर्गत रस्ता उद्घाटन, खडकोळी जनजीवन मिशन पाणी पुरवठा योजना उद्घाटन, पन्हळघर बुद्रुक अंतर्गत रस्ता उद्घाटन, पन्हळघर बुद्रुक जनजीवन मिशन पाणी पुरवठा योजना उद्घाटन, अंबर्ले मुख्य रस्ता डांबरीकरण भूमिपूजन, अंबर्ले कातळाचा कोंड जोड रस्ता भूमिपूजन, खांडपाले अंगणवाडी इमारत भूमिपूजन, खांडपाले शाळागृह इमारत भूमिपूजन, पहेल डांबरीकरण रस्ता उद्घाटन, पहेल जनजीवन मिशन पाणी पुरवठा योजना उद्घाटन, लोणेरे सभागृह उद्घाटन, लोणेरे रामनगर रस्ता भूमिपूजन, लोणेरे जनजीवन मिशन पाणी पुरवठा योजना उद्घाटन, लोणेरे गावात पेव्हरब्लॉक रस्त्याचे उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार भरत गोगावले यांच्या शुभहस्ते कविलवाल, तळेगाव, उसरघर वाडी नवघर, लोणेरे वाडी नवघर, मांगरुळ,वाघोसे, खडकोळी, पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द, अंबर्ले, अंबर्ले कातळाचा कोंड,वडाचा कोंड, पहेल,खांडपाले, लोणेरे, रामनगर लोणेरे या ठिकाणी करोडो रुपयांच्या विकास कामांचे श्रीफळ वाढवून भुमीपूजन झालेल्या कामाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमाला जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, महिला जिल्हाध्यक्षा निलीमा घोसाळकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, माजी सभापती सुजित शिंदे, उपतालुकाप्रमुख प्रमुख पंढरी शेंडगे, माणगाव तालुका संपर्क प्रमुख प्रताप घोसाळकर, सिताराम उभारे, विभाग प्रमुख रविंद्र टेंबे, उपविभाग प्रमुख समाधान करकरे, उपविभाग प्रमुख शेखर घोसाळकर, अरुणा वाघमारे, स्वाती करकरे, सिताराम उभारे, माजी पंचायत समिती सदस्य नथुराम करकरे, मांगरुळ सरपंच सितळ वारिक, जगदीश जोशी, उपतालुकाप्रमुख अभिजित टेंबे, लोणेरे सरपंच प्रकाश टेंबे, तळेगाव सरपंच म्हात्रे, सरपंच संतोष वातेरे, दिलीप टेंबे, माजी उपसरपंच प्रमोद करकरे, समाधान कानू करकरे, माजी सरपंच संदीप शिगवण, अनिकेत घोसाळकर, नथुराम अंधेरे, अक्षय अंधेरे,शाखाप्रमुख दिपक करकरे, विभागातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,शिवसेना पदाधिकारी व शाखाप्रमुख उपशाखा प्रमुख, युवासेना शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 टिप्पण्या