माणगांवमधील साईनगरच्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप.

 माणगांवमधील साईनगरच्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप.

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. १७- माणगांवमध्ये गेले २२ वर्षाची परंपरा असलेल्या साईनगर मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यावर्षी २०२४ चा "संत गोरा कुंभार यांची विठ्ठल भक्ती" हा चलचित्र देखावा यावर्षी माणगांवकरांचे खास आकर्षण ठरला आहे. ह्या चालचित्राला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक देखील मिळाले. माणगांवमध्ये असलेल्या साईनगरमध्ये  विविध राज्य, जिल्हा, गावातील लोक स्थायिक होऊन गुण्यागोविंदाने नांदत आहेत. विविधतेतून एकता दाखवणाऱ्या या साईनगर मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाची गेली २२ वर्षाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी असणारा चलचित्र देखावा हा धर्मग्रंथ आधारित असला तरी नागरिकांनी त्याचा अद्वैत अर्थ घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा समजून घ्यावा याचा अर्थ असा की, तरुण पिढी भक्ती मार्गापासून कुठेतरी लांब चालली आहे. त्या युवा पिढीने अध्यात्मिक मार्गाकडे वळावे, असा सामाजिक जनजागृती चा संदेश आम्ही या चलचित्रातून  देत आहोत असे मत साईनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश दुरकर  यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

साईनगरच्या गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणुक यावर्षी   दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ढोल  ताशांच्या गजरात लेझीमच्या ठेक्यावर साईनगर चौक ते निजामपूर रोड मुंबई गोवा हायवे ते खांदाड येथील काळ नदी गणेश विसर्जन घाटावर साईनगरच्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.

साईनगर गणेशोत्सव मंडळाने सन २०२४ यावर्षी अनेक सामाजिक उपक्रम तसेच अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये रविवार ८ सप्टेंबर रोजी मटका फोडणे, पोती उडी व  दि. ९ सप्टेंबर रोजी चमचा गोटी शेपूट लावणे, दि. १० सप्टेंबर रोजी संगीत खुर्ची, दि. ११सप्टेंबर प्रश्नमंजूषा, दि. १२ सप्टेंबर रोजी बादलीत बॉल टाकणे, दि। १३ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा, महिला महाआरती, दि. १४ सप्टेंबर रोजी शक्ती तुरा,  अंताक्षरी  दि. १५ सप्टेंबर रोजी रेकॉर्ड डान्स (लहान गट), दि. १६ सप्टेंबर रोजी रेकॉर्ड डान्स (खुला गट) व बक्षीस वितरण कार्यक्रम असा संपुर्ण कार्यक्रम पडला.

   संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यावर्षी साईनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष परेश म्हात्रे, सचिव प्रणव जंगम, सहसचिव केतन घोसाळकर, खजिनदार स्वप्निल झेंडे, सहखजिनदार केदार जाधव व सर्व जेष्ठ सल्लागार, मार्गदर्शक व जेष्ठ सभासद यांनी महत्वाची भूमिका बजावली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या