रेपोली गावात तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी

 रेपोली गावात तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २८- महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमधून आपल्याला प्रेरणा मिळते. तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. संत तुकाराम हे एक वारकरी संत होते. संत तुकाराम यांचा जन्म देहु गावात झाला. संत तुकाराम यांना 'जगद्गुरू' म्हणून ओळखले जाते.

या आठवणीला उजाळा देऊन तरुण पिढीने या पुढे ही गावची परंपरा अशीच कायम स्वरूपी जोपासावीत आणि यापुढे गावचगावपन  असच टिकून राहो हा उद्देश  ठेउन माणगाव तालुक्यातील रेपोली गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ, मुंबईकर मंडळ, तसेच महिला मंडळ यांनी एकत्रीत येऊन रेपोली गावचे अध्यक्ष रघुनाथ बेंदूगडे  याच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण गावातील आजी माजी पदाधिकारी एकत्रीत येऊन मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या  टाळमृदुंगा च्या गजरात अभंग गात  तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची पालखी संपूर्ण रेपोली गावात मिरवणूक काढून ह. ब. प. रामदास रा. बोंडविलकर महाराज यांचे किर्तन आयोजित करून मोठ्या उत्साहात तुकाराम बीज साजरी करण्यात आली.


यावेळी गावचे अध्यक्ष रघुनाथ बेंदूगडे याच्या अध्यक्षतेखाली रेपोली ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण मंडळ, मुंबईकर मंडळ रेपोली  यांना खेळीमेळीच्या वातावरणात काळ्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या