सोनभैरव गोविंदा पथक खांदाडने रचले ८ थर ; नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी केले कौतुक

 सोनभैरव गोविंदा पथक खांदाडने रचले ८ थर  

नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी केले कौतुक

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. ९ - माणगांव तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सोनभैरव गोविंदा पथक खांदाडने महाड येथे मानवी मनोरे करीत ८ थरांची सलामी देऊन ५१०००/- चा पारितोषिक तर रोहा येथे ७ थर लावून २५०००/- चे पारितोषिक पटकावला. त्याबद्दल माणगांव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी सोनभैरव खांदाड गोविंदा पथकाचे कौतुक केले.

   दि. ७ सप्टेंबर रोजी गोपाळकाला निमित्त महाड, लोणेरे, गोरेगाव, रोहा येथे जाऊन सोनभैरव गोविंदा पथक खांदाड पुरुष ८ व ७ आणि मुली ५ थर मानवी मनोरे रचत संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावलौकिक केले आहे. व भरघोस बक्षीस मिळविले. गेल्या एक महिन्यापासून नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच गावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने सोनभैरव मंडळ खांदाड पथक यांचा जोरदार सराव चालू होता. यात गोविंदा पथक चे अध्यक्ष महेश (उर्फ बाळा डिजे) मारुती पवार यांनी सर्व सहकार्यांकडून सुयोग्य पद्धतीने सराव करून घेतला. संपुर्ण खांदाड वासीयांनी यासाठी सहकार्य केले. 

रोहा येथे खा. सुनील तटकरे आयोजित दहीहंडी येथे ४ एक्के लावून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या