माणगांवमध्ये छावा प्रतिष्ठान आणि मावळा प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव सुपरहिट

 माणगांवमध्ये  छावा प्रतिष्ठान आणि मावळा प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव सुपरहिट



पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ९- माणगावमध्ये युवा नेते  निलेश थोरे मित्रमंडळ आणि छावा प्रतिष्ठान माणगाव व माणगांव मध्ये युवा उद्योजक राजेश कदम यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या मावळा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने माणगावमध्ये गेले ५ वर्षाची परंपरा असलेला दहीकाला उत्सव माणगांव मुंबई गोवा हायवेवर अल्ताफ दादा धनसे यांच्या मोकळ्या मैदानात जोमात आणि उत्तसहात पार पडला. 

यावेळी या दहीहंडीसाठी माणगांव तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील विविध पुरुष गोविंदा पथके आणि महिला गोविंदा पथके यांनी उपस्थिती लावून मानवी मनोरे रचले.

पर्यटकांसाठी विशेष आकर्षण म्हणून सिने स्टार आणि विविध नृत्यांगना व स्टार यांचा नृत्य आविष्कार देखील सादरीकरण करण्यात आले. विविध गोविंद पथकांना छावा प्रतिष्ठान व मावळा प्रतिष्ठान कडून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचा आयोजनात दोन्ही प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. छावा प्रतिष्ठान चे प्रमुख पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष निलेश थोरे, संजय पंदेरे- मा. सभापती कृ. ऊ. बा. स., महेश सुर्वे - संचालक कृ. ऊ. बा. स., उपाध्यक्ष - स्वप्नील सकपाळ, उपाध्यक्ष - सागर गांधी, सचिव - परेश सांगले,सल्लागार - रवींद्र मोरे, सल्लागार - प्रकाश जाधव,विजय भोनकर, ओमकार गायकवाड, मंदार मढवी, किरण कांबळे, सौरभ पांडे, अजित जाधव, सौरभ बक्कम, रोहित मोहिते, सुबोध कासारे, अविनाश सोलंके व मावळा प्रतिष्ठानचे सल्लागार - सुशील म्हामुनकर, सूमेश म्हामुनकर, संस्थापक -राजेश कदम ,अध्यक्ष - संदीप म्हामुनकर, उपाध्यक्ष -  मयूर गुरव,कार्याध्यक्ष -राज विश्वकर्मा,सचिव - अल्पेश कापडेकर, सहसचिव - कु.जयेश कासारे, खजिनदार - उमेश यादव,सहखजिनदार - शेखर घाग, संपर्क प्रमुख - अमोल पवार, सहसंपर्क प्रमुख - यश खामकर, प्रमुख सदस्य -विकी दुरकर, सुजित पवार, अभी मुंढे, रविष गोटेकर, रवींद्र बावदाने, अभी वाढवळ, श्रीकांत राठोड, मयूर सोनवणे, विवेक गायकवाड, करण वर्मा, अविनाश साळुंखे, राज वर्मा, देवा येरुणकर, संयोग टेंबे, गणेश टेंबे, शैलेश गायकवाड, जितू भोनकर यांनी विशेष मेहनत घेतली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या