माणगांवात उपकोषागार अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

माणगांवात उपकोषागार अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

अधिकाऱ्याला ६ हजार रुपयांची लाच घेताना पकडले  रंगेहाथ

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १५-  लाच देणं-घेणं या कायद्याने गुन्हा असून अशा प्रकार करणाऱ्यांवर लाचलुचपत विभागाकडून कडक कारवाई करण्यात येते. अशीच एक घटना माणगांव तालुक्यात घडली असून उपकोषागार अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीनंतरचे सुधारित आश्वासित प्रगतीनुसार ग्रॅज्युटीची फरक रक्कम ४५०५० रु. इतक्या रकमेचे बिल मंजूर करून बँक खात्यात जमा करण्याची मंजुरी देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे उपकोषागार कार्यालय माणगांव तालुका उपकोषागार अधिकारी मारुती रामचंद्र पवार यांनी ६००० रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याप्रमाणे दि. १५ सप्टेंबर रोजी दु. १.५५ वा. च्या सुमारास ६००० रुपयांची लाच घेताना आरोपी मारुती पवार यांना लाचलुचपत विभागाने उपकोषागार कार्यालय माणगांव येथे  रंगेहाथ पकडले आहे. सदर सापळा  पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो शशिकांत पाडावे,  पो. नि. नवनाथ चौधरी, स. फौ. विनोद जाधव,  शरद नाईक, पो. ह. महेश पाटील, पो. ना. सचिन आटपाडकर यांनी यशस्वीरित्या पार पाडला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या