सिदधनेर्ली विद्यालयात कार्यशाळा संपन्न

 सिदधनेर्ली विद्यालयात कार्यशाळा संपन्न


पोलीस प्रवाह न्यूज 

सिदधनेर्ली ता.१४ येथील सिदधनेर्ली विदयालय व ज्युनिअर कॉलेज, सिदधनेर्ली प्रशालेत आज पर्यावरण पुरक श्री गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शक म्हणून विदयालयाचे कलाशिक्षक मा.श्री अवधुत पोतदार सर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पुरक श्री गणेश मूर्ती कशी तयार करावी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले.

 या कार्यशाळेत इयत्ता सहावी, सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. केमिकल युक्त रंगामुळे होणारे प्रदूषण रोखता यावे व पर्यावरण संरक्षणाला थोडा हातभार लावता यावा. या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम सर, मुख्याध्यापक श्री सारंग ए पी सर व पर्यवेक्षक श्री एस आर मगदूम सर यांचे प्रोत्साहन मिळाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या