निळगुण गावाचा सुपुत्र कुमार आदेश बळीराम गुगळे याची कठीण परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्य दलात निवड
माणगांव- दि. १७- माणगाव तालुक्यातील निळगुण गावातील कु. आदेश बळीराम गुगळे याची भारतीय सैन्य दलातील मराठा बटालियन व स्वप्नाली सुरेश खैरे हीची महाराष्ट्र पोलीस सेवेतील रायगड पोलिस दलात निवड झाल्याबद्दल निळगुण गावचे युवक तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांनी स्वांतंत्रदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी भव्य सत्कार सोहळ्याचे व मिरवणुकीचे आयोजन केले होते. याचबरोबर गावातील इयत्ता १० वी, १२वी, पदवीधर विद्यार्थ्यांचा तसेच गावातील सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
सत्कार सोहळ्यासाठी गावातील तरुण नेतृत्व व ज्येष्ठ नागरिक, महिला लहान थोर मंडळी, प्रथिमक व माध्यमिक शाळेचे आजी माझी शिक्षक, मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात भव्यदिव्य असा हा समारंभ पार पडला.
आदेश हा निळगुण गावच्या आजवरच्या इतिहासतील भारतीय सैन्य दलामधे दाखल होणार पहिला मुलगा असल्याने. त्याचे विशेष कौतुक आणि संपूर्ण गावाला त्याचा खूप खूप अभिमान आसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आदेश हा एक गरीब कुटुंबातील असून त्यांच्या आई वडिलांनी शेती करून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. परंतु लहानपणापासूनची असलेली जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची तयारी व कोणत्याही परिस्थीत हार न मानता वडिलांनी दिलेली शिकवण ह्यामुळे आदेश आज हे यश संपादन करू शकला आणि आपल्या गावाचे नाव देशपातळीवर घेऊन जण्याची व आपल्या पंचक्रोशीतील व तालुक्यातील युवा मुला मुलींना प्रेरणा देईल अशी एक मोलाची कामगिरी त्याने केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.



0 टिप्पण्या