विहीरीत पडलेल्या रानडुक्करला वन विभागाने दिले जीवनदान
माणगांव-दि. १७- गोरेगाव येथील मल्लिकार्जुन टेकडी लगत राहत असलेले सुनील मराठे यांच्या विहिरीत मध्यरात्री रान डुक्कर पडल्याचे लक्षात आले. सकाळी लवकरच त्यांनी वन विभागाला कळविले. वन विभाग माणगाव मधील कर्मचारी त्वरित हजर होऊन डुक्कराला दि. १७ ऑगस्ट रोजी बाहेर काढले आहे.
सविस्तर असे कि, गोरेगावला विहिरीत पडलेल्या रान डुक्कराची माहिती मिळताच वन विभाग माणगाव येथील कर्मचारी घटनस्थळी पोहचले. या डुक्करला काढण्यासाठी महाड वन विभागाची रेस्कु टीम हजर झाली. त्यांनी लगेचच आपल्या पद्धतीने डुक्करास विहिरीतून बाहेर काढून पिंजऱ्यात टाकून रेस्कू केले. त्यानंतर त्यास मौजे फलाणी येथे जंगलात सोडले.
या रान डुक्कर रेस्कू प्रकरणी उप वनसंरक्षक रोहा यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल माणगाव, वनक्षेत्रपाल महाड, वनपाल गोरेगाव व वनरक्षक डी बी निवाते, वनरक्षक वर्षा वेव्हारे, आणि रेस्कु टीम महाड यांनी रान डूक्करास जीवनदान दिले.




0 टिप्पण्या