विजय बक्कम यांनी आदिवासी मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

 विजय बक्कम यांनी आदिवासी मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १८- शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. सर्वांना शिक्षण घेता यावे. यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात. शिक्षणामुळे आयुष्य चांगल्याप्रकारे जगता येते. परंतु, काही मुलांना त्याच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. ते शिक्षणापासून वंचित राहिल्याने त्यांना प्रगती करता येत नाही. शिक्षणाच मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. ज्या मुलांची परिस्थिती बिकट आहे. पण त्यांना शिक्षण घेता आले पाहिजे. यासाठी अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते काम करीत आहेत. अशाच प्रकारे कोशिंबळे येथील शाळा कमिटी अध्यक्ष विजय बक्कम यांनी ७ आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

रा. जि. प. शाळा कोशिंबळे येथील मुख्याध्यापिका सुवर्णा बेर्डे, भारत कडाळी यांनी सांगितले की, सन मे २०२२ मध्ये कोशिंबळे आदिवासी वाडी येथे २ आदिवासी कुटूंब कामानिमित्त आले. या कुटुंबात एकूण ७ मुले होती. त्यांना शाळा, शिक्षण काय असते याची अजिबात माहिती नव्हती. त्यांना शाळा देखील कधी बघितली नव्हती. तेव्हा शाळा कमिटी अध्यक्ष विजय बक्कम यांनी त्या कुटूंबाला भेटून त्यांना शिक्षणाच महत्व पटवून दिले. मुलांना शाळेत येण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करून घेतली. शाळेच्या पाहिल्या दिवशी ७ मुलांना शाळेत घेऊन येऊन त्यांना पहिल्या दिवसांपासून ते पुढील दीड महिना रोज विजय बक्कम त्यांच्या गाडीतून ने आण करत. मुलांना गणवेश, वह्या, पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य यांची सोय विजय बक्कम, मुख्याध्यापिका व सामाजिक कार्यकर्त्यानी करून दिली. 

शाळेत आल्यानंतर मुख्याध्यापिका सुवर्णा बेर्डे व शिक्षिका भारती कडाली यांनी मुलांमध्ये शाळेची व शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांच्याकडून शिक्षणाचे धडे गिरवून घेतले. आज ७ ही मुले शिक्षण घेत असून ती नियमित शाळेत येत आहेत. शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. आदिवासी मुलांना शाळेत टिकविण्याचे काम सुद्धा शिक्षकांनी केले आहे. तसेच रा. जि. प. शाळेत योग्य शिक्षण मिळते. रा. जि. प. शाळा टिकल्या पाहिजेत. याविचाराने विजय बक्कम यांची इंग्लिश मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलीला त्यांनी जि. प. शाळेत टाकले आहे.  आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यामुळे शाळा कमिटी अध्यक्ष विजय बक्कम, मुख्याध्यापिका सुवर्णा बेर्डे, शिक्षिका भारती कडाळी यांचे तालुक्यातून कौतून होत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या