माणगांवमध्ये तस्करी करून आणलेली ६ म्हैस जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक माणगांव पोलिसांनी पकडली
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १८- माणगांव तालुक्यात मागील वर्षी सुरू असलेल्या घटना म्हणजे पाळीव जनावरांची तस्करी, कत्तल किंवा कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची अवैध वाहतूक ह्या गोष्टींनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे ६ म्हैस जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो माणगांव पोलिसांनी दि. १८ एप्रिल रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास पकडला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १८ एप्रिल च्या रात्री मुंबई गोवा महामार्गावरून जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती माणगांव पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला या टीममध्ये पो. स. ई अस्मिता पाटील, पो. ह. दर्शन दोडकुळकर, पो. शि. शिवाजी मिसाळ, पो. शि. विनय पाटील यांनी कामगिरी बजावली व इंदापूर गावच्या हद्दीत बायपास रोड जवळ अशोका लेलँड कंपनीचा टेम्पो क्रं एम एच ०३ सी व्ही ९६२४ हा पांढऱ्या रंगाचा मागच्या बाजून ताडपत्रीने झाकलेला टेम्पो अडविण्यात आला. त्यामध्ये प्रवास करणारे चालकांसह २ जणांना विचारणा करून पोलिसांनी पाहणी केली असता त्यात १ लाख १० हजार किंमतीची छोटी मोठी अशी एकूण ६ म्हैस जातीची जनावरे ३ लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण ४ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल व या घटनेतील आरोपी प्रेमकुमार परमेश्वर सूर्यवंशी वय वर्षे २८ रा. गोवंडी त्याच्या शेजारी बसलेले नदीम गुफ्फार कुरेशी वय वर्षे (२१) रा कल्याण बाजारपेठ व समीर निजाम कुरेशी वय वर्षे २० रा. गोवंडी यांना माणगांव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या टेम्पो मध्ये ६ पाळीव म्हैस जातीची जनावरे दाटी-वाटीने कोंबून भरून त्यांच्या चारा-पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था न करता जनावरे वाहुन नेण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना ती कोठून तरी चोरून आणलेली जनावरे मुंबई येथे कत्तलीसाठी नेत असताना माणगांव पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. रजि. नं.१२०/२०२३ भा. दं. वि. स. कलम ३७९, ३४, प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ - ५ अ, ५ब, ९अ, ११, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०- ११(१) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. अस्मिता पाटील करीत आहेत.





0 टिप्पण्या