मुलांवर तुमची स्वप्ने लादू नका त्यांना विचाराचे स्वातंत्र्य द्या.

 मुलांवर तुमची  स्वप्ने लादू नका त्यांना  विचाराचे स्वातंत्र्य द्या.


पोलीस प्रवाह न्यूज 

सिद्धनेर्ली : दि. २१ - कुमार विद्या मंदिर सिद्धनेर्ली येथे इयत्ता चौथी सदिच्छा समारंभानिमित्त ' मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांची भूमिका ' या विषयावर डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.त्याप्रसंगी बोलताना सर म्हणाले," मुले स्वतःचा विचार ,स्वप्ने घेऊन जन्माला आलेली असतात.त्यांच्यावर तुमची स्वप्ने लादू नका.त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. " या प्रसंगी ' अनुबंध ' या हस्तलिखिताचे प्रकाशन व चौथी प्रज्ञाशोध निवड यादीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

मा.गटशिक्षणाधिकारी कमळकर साहेब यांनीही पालकांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी सरपंच दत्तात्रय  , शाळा समिती अध्यक्ष सुदाम पाटील, व्ही. जी.पोवार सर, शाळा समिती सदस्य , शाहीर निकम ,कॉ. शिवाजी मगदूम , विवेक पोतदार,  पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन मा.मुख्याध्यापक पुजारी सर , सूत्रसंचालन विद्या भोसले व आभार विद्या चव्हाण यांनी मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या