माणगांव जत्रेत हरवलेल्या ३ वर्षीय मुलाला माणगांव पोलिसांनी केले पालकांच्या हवाली
माणगांव-दि. १५- माणगांव तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आणि शेवटून दुसरी जत्रा म्हणून माणगांव शहरातील श्री दत्ताची जत्रा म्हणून ओळखले जाते. माणगांव शहरातील मुंबई गोवा हायवे, मोर्बा रोड, कचेरी रोड, निजामपूर रोड आशा ठिकाणी भरगच्च विविध वस्तूंची दुकाने व आकाश पाळणे आणि देवांच्या काठ्या, पालखी अशी रोमहर्षक माणगांवची जत्रा असते. यावर्षी ही जत्रा दि. १४ एप्रिल रोजी झाली यावेळी बंदोबस्तात तैनात असणाऱ्या माणगाव पोलिसांनी एक जबरदस्त कामगिरी बजावली आहे.
माणगांव पोलिसांचे माणगांव तालुक्यामध्ये सामाजिक योगदान तर नेहमीच अग्रेसर राहिले आहे. दि. १४ एप्रिलच्या रात्री माणगाव जत्रेमध्ये हजारोंच्या संख्येने जनसमुदाय फिरत होता. याच वेळी रात्री ११:३० वा. च्या दरम्यान एक तीन वार्षिय लहान मुलगा जत्रेत भटकटुन वावरत असताना दिसून आल्यानंतर त्याला माणगांव वाहतूक पोलीस चौकी येथे आणण्यात आले. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी सूत्रे फिरविल्यानंतर चौकी जवळ त्याची आई आली. पायरीवर बसलेला तो चिमुकला आईला बिलगला. त्यांनतर ही परिस्थिती हाताळणारे माणगांव पोलीस ठाण्याचे स. पो. नि. नितीन मोहिते, पो. ह. प्रशांत पाटील, म. पो. शि. दिपाली मोरे, म. पो. शि. अश्विनी मदने यांनी काही वेळानंतर त्याचे आई वडील आल्यावर खात्री करून व त्यांचे कागदपत्रे घेवुन ओळख पटवून मुलाला ताब्यात दिले.
सदर ३ वार्षिय मुलाचे नाव कार्तिक अंकुश काटकर रा. लोणशी आदिवासी वाडी. यात्रेच्या दिवशी प्रथम त्याची आई सुजाता काटकर ही हजर झाली. त्यानंतर मुलाचे वडील अंकुश काटकर हजर झाले. त्यांच्या ह्या लहानग्या मुलाला माणगांव पोलिसांनी त्यांच्या ताब्यात दिले आहे. ऐन गर्दी आणि धाम-धुमीच्या काळात चोख बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन मोहिते यांच्या टीमने माणगांव यात्रोत्सवदरम्यान केलेल्या कामाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे.




0 टिप्पण्या