करमाळा महावितरणचा शंभर टक्के वीज बिल वसुलीत जिल्ह्यात पाचवा क्रमांक

 करमाळा महावितरणचा शंभर टक्के वीज बिल वसुलीत जिल्ह्यात पाचवा क्रमांक.

पोलीस प्रवाह न्यूज

 करमाळा : दि. १४ -करमाळा वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र ड्युटी बजावत ग्रामीण तसेच शहरी भागातील घरगुती व शेतीचे  दि११/०४/२०२३ रोजी माहे २०२३महावितरण कंपनीच्या दिलेले वसुलीचे उद्दिष्ट १००/; पेक्षा जास्त पार पडले मुळे करमाळा उपविभागीय अधिकारी मा श्री एस व्ही जाधव साहेब उपकार्यकारी अभियंता साहेब करमाळा यांचे वतीने पोथरे येथील आनंदी लॉन्स मध्ये आयोजन करण्यात आलेला गुणगौरव सोहळा सह कुटुंब पार पडण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष करमाळा तालुका तहसीलदार मा श्री माने साहेब होते ,यावेळी मा श्री अधीक्षक अभियंता साहेब मा श्री सांगळे साहेब कार्यकारी अभियंता मा श्री कुऱ्हाडे साहेब पोलिस निरीक्षक मा श्री गुंजवते साहेब ,पोलिस अधिकारी श्री भुजबळ साहेब ,सर्व मा अभियंता वर्ग ,कर्मचारी वर्ग श्री पवार साहेब, ग्रामीण २श्री शिंदे साहेब , करमाळा शहर श्री वाघमारे साहेब ग्रामीण १ मा श्री ढेरे साहेब गुणवत्ता नियंत्रण व्यासपीठावर उपस्थित होते,यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्मचारी व अधिकारी यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुणे येथील पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते, याचं बरोबर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी थकबाकी वसुली झीरो केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले एकूण अठरा कर्मचाऱ्यांना सत्कार आणि सर्व अधिकारी ऑपरेटर वायरमन सुरक्षा रक्षक यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुराणिक साहेब श्री कट्टी साहेब यांनी केले होते आभार श्री प्रशांत गाठे साहेब यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या