वणवा विझवण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू

 वणवा विझवण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १८- वणवा विझवण्यासाठी गेलेल्या इसमाचा अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १७ मार्च रोजी फिर्यादी दिनेश महिपत केकाणे व मयत रुपेश बाळाराम केकाणे, वय ४० वर्ष, रा. लोणशी हे वणवा विझवण्यासाठी गेले होते. मयत रुपेश हा घरी पोहचला नाही असे त्याच्या वडिलांनी सांगितले असता फिर्यादी व रुपेश याचे वडील हे लागलेल्या वणव्या ठिकाणी त्यास पाहण्यास गेले त्यावेळी वणव्यापासून जवळच पाण्याच्या ओहळा जवळ रुपेश बाळाराम केकाणे हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. तसेच डावा पाय भाजलेला दिसला असता त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे घेऊन आले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे १३/२०२३ सी. आर. पी. सी. कलम १७४ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. स. ई. किर्तीकुमार गायकवाड करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या