आनंद मंगल साहित्य परिषदेच्या वतीने 'आदर्श माता ' पुरस्कार
कुंकुलोळ, गोडसे,तोष्णीवाल 'आदर्श माता'
चिंचवड: दि. १५ -आनंद मंगल साहित्य परिषद चिंचवडच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये स्वकर्तुत्वाने परिवाराचा,समाजाचा, विकास करणाऱ्या महिलांचा आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आशालता माणिकलाल कुंकूलोळ यांना संस्कार आदर्श माता,मानसी सुहासजी गोडसे यांना सेवाभावी आदर्श माता व विजया नंदकुमार तोष्णेवाल यांना कर्तव्यदक्ष आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.सुरेखा कटारिया, सुपरवायझर ऑफ जीएसटी चे देवेंद्र बाकलीवाल ,महिला पोलिस अधिकारी मनीषा पोकळे,माजी नगरसेविका आशाताई सूर्यवंशी,स्वरत्न भूषण तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बाकलीवाल यांनी जडण घडणीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते.समाजात मुलांना संस्काराचे संस्करण करण्याचे काम महिला करत असतात.असे मत व्यक्त केले.पोकळे यांनी आजच्या जागृत समाजात घडविणारी माता ही प्रथम गुरुस्थानी असते .यावेळी त्यांनी आनंद मंगल साहित्य परिषदेतर्फे महिलांसाठी व बालकांसाठी करीत असलेल्या विशेष कार्य बद्दल संस्थेचे अभिनंदन केले. तसेच पोलीस आयुक्तालया तर्फे महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.संस्थेने नव्याने सुरू केलेल्या पाणपोईचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालिका शलाका कटारिया, सूत्रसंचालन संस्थेच्या महामंत्री डॉ.श्वेता राठोड यांनी केले. या कार्यक्रमात धनंजय कुलकर्णी,नंदकुमार तोष्णीवाल, प्रा.प्रकाश कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.




0 टिप्पण्या