पुन्हा एकदा माणगांवात घरफोड्या
हजारोंचा ऐवज लंपास करून चोरटे फरार
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १४-माणगांव शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील एकाच दिवशी अनेक घरफोड्या झाल्या होत्या. तशाच पुन्हा एकदा घरफोड्या झाल्या असून हजारोंचा ऐवज लंपास करून चोरटे फरार झाले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, सोमवार दि. १३ मार्च रोजी दु. १२ ते २.३० वा. च्या सुमारास फिर्यादी समीर सदानंद पावर, वय ३२ वर्ष, रा. साईसागर बिल्डिंग, रुम नं. ३०२ यांच्या घराच्या दरवाजा कडी कोयंदा कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील रु. १०००० किमतीची सोन्याची रिंग, रु. १०००० किमतीचे सोन्याचे लॉकेट व रु. ४५००० रोख असा एकूण ६५००० रुपयांचा मुद्देमाल स्वतःच्या फायद्याचकरिता चोरून नेला. तसेच याच बिल्डिंगमधील ३ व कचेरी रोड वरील एका सदनिकेमध्ये सुद्धा घरफोडी झाल्याची चर्चा माणगांव शहरात ऐकावयास मिळत आहे.
या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ६६/२०२३ भा. दं. वि. सं. क. ४५४, ३८० प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. मगर करीत आहेत.

.jpeg)


0 टिप्पण्या