डिंगणी-करजुवे मार्गालगत निर्जन स्थळी मच्छि विक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह

 डिंगणी-करजुवे मार्गालगत निर्जन स्थळी मच्छि विक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह

अपघात कि घातपात; पोलीस तपास सुरू 

पोलीस प्रवाह न्यूज

संगमेश्वर-दि. १७- संगमेश्वर तालुक्यातील डींगणी - करजुवे मार्गावर मच्छि विक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह जंगल परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. सहिदा रिजवान सय्यद वय ५० वर्षे, राहणार हनुमान नगर रत्नागिरी असे या महिलेचे नाव आहे. डिंगणी-करजुवे, पिरंदवणे अशा ४-५ गावामध्ये सहिदा सय्यद मच्छि विक्री करून कुटुंबाचा उदर निर्वाह करते. डिंगणी - करजुवे, पिरंदवणे अशा ४-५ गावामध्ये ही महिला मच्छि विक्री करून कुटुंबाचा उदर निर्वाह करते. मात्र बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी त्या घरातून सकाळी मच्छि विक्रीसाठी बाहेर पडल्या. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. शोधाशोध करत असताना डिंगणी करजुवे रोडवर त्यांची माशांची टोपली पडलेली दिसली. तिचा आजूबाजूला शोध घेतला असता रस्त्याच्या बाहेर जंगलात तिचा मृतदेह आढळून आला. जवळपास ३०- ४० फुटांवर ओढत नेवुन हा मृतदेह निर्जंस्थळी टाकण्यात आला होता. तिच्या चेहर्यावर जोरदार प्रहार झाल्याने चेहरा ओळखता येणे मुश्किल झाले होते. नातेवाईकानी याची माहिती संगमेश्वर पोलिसांना दिली. 

पोलिसांनी तातडिने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाल्यवर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे बोलले जात आहे मात्र अपघात असेल तर तोंडावर जखमेचा मारहाण कशी ? व मृतदेह ४० फुट आत का नेण्यात आला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आल्यावरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. दरम्यान डिंगणी-करजुवे परिसरात चिरा आणि वाळुची मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते. रस्त्याला वर्दळ कमी असल्याने हे चालक बेदरकार पणे वाहने चालवतात. यातुन या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातुन हा अपघात किंवा घातपात झाला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त करणारा अंदाज वर्तवला जात आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या