दापोली मध्ये शिंदे गट व ठाकरे गटात जोरदार राडा.
पोलीस प्रवाह न्यूज
दापोली : दि. १८ मंडणगड दापोली खेड विधानसभेचे (शिंदे गटाचे)आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.यामुळे दापोलीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट समर्थकानी ताब्यात घेतली.
शिवसेना पक्ष हे नाव व धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळाले आहे, त्यामुळे शिवसेना शाखा आमचीच आहे असे म्हणत आमदार योगेश कादमांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जोरदार राडा केला.
निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह मिळताच आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाची शाखा ताब्यात घेतली.यामुळे दापोलीत शिंदे गट - ठाकरे गटात जोरदार राडा झाला.
शिवसेनेचा निकाल लागल्यानंतर शिंदे गटाचा जल्लोष सुरू होता.
त्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते अधिकृत कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी गेले.याच शाखेवरुन दोन गटात राडा झाला.दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.घटनास्थळी धाव घेत दापोली पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवले.
शाखेचा ताबा आमदार योगेश कदम यांनी घेतला.दापोली शहर शिवसेना शाखा अखेर आमदार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतली आहे. यापूर्वी सहा महिन्यापूर्वी ही शाखा "ताबळगडावरून" मोठा राडा उडाला होता .१७ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्ष नाव व धनुष्यबाण चिन्ह याचा निर्णय लागल्यानंतर तात्काळ ही शाखा आमदार योगेश कदम समर्थकांकडून ताब्यात घेण्यात आली आहे.



0 टिप्पण्या