समरजीतसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी शाळेस साऊंड सिस्टिम भेट.
पोलीस प्रवाह न्यूज
कोल्हापूर : दि. २४ - शाहू ग्रुपचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष,राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुमार व कन्या विद्या मंदिर, सिद्धनेर्ली. या शाळेस कराओके साऊंड ट्रॅक सिस्टिम व दोन माईक सिद्धनेर्ली विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सिद्धनेर्लीचे श्री संदीप मगदूम (सर) व पंचलक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष श्री तानाजी पोवार (सर) यांनी भेट दिले.
विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे उद्गार यावेळी संदीप मगदूम सर व तानाजी पोवार सर यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी शाहू कारखान्याचे संचालक प्रा. सुनील मगदूम सर , सिद्धनेर्ली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए. पी. सारंग (सर),कुमार विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री गणपती पुजारी सर,कन्या विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.शालन कुंभार मॅडम, शिक्षक व शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.



0 टिप्पण्या