रूढी-परंपरा टाळून दाखणे ग्रामपंचायत हद्दीतील विधवा, मागासवर्गीय, आदिवासी महिला भगिनींचा एकत्रित हळदी कुंकू व खेळ पैठणीचा सोहळा
ग्रुपग्रामपंचायत दाखणे हद्दीतील शेकडो महिला भगिनींनी लुटले आनंदाचे वाण
सरपंच विश्वास उभारे यांचा स्तुत्य उपक्रम
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि-२४- ग्रुप ग्रामपंचायत दाखणे सरपंच विश्वास दिलीप उभारे यांच्या संकल्पनेतून ग्रुप ग्रामपंचायत दाखणे हद्दीतील स्थानिक व नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईस्थित महिलांसाठी हळदी कुंकु समारंभ व खेळ पैळणीचा हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. ग्रामस्थ, महिला व मुंबईकर मंडळ दाखणे यांचे वतीने दाखणे गांवचे सुपुत्र बाळासाहेबांची शिवसेना-युवासेना द. रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माजी जि. प. सदस्या अपर्णा घोसाळकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक निलिमा घोसाळकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून सरपंच विश्वास उभारे, ग्रामस्थ,महिला व मुंबईकर मंडळ दाखणे यांचे सुरेख आयोजनाबद्दल विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
महिला भगिंनी स्वत:चा आनंद बाजुला ठेवून दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या कुटुंबासाठी राबत असतात, कष्ट घेत असतात. त्या महिला भगिंनींना सुध्दा एक दिवस स्वत:साठी मनमुराद जगता यावे, आनंद लुटता यावा या भावनेतूनच सरपंच विश्वास उभारे यांच्या संकल्पनेतून खास महिला भगिंनीसाठी हळदी कुंकु समारंभ व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खेळ पैठणीचा या कार्यक्रमात एकूण २१ पैठण्यांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. दिवसभर महिलांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन मनमुरादपणे खेळाचा आनंद लुटला.
हळदी कुंकू म्हणजे सुवासिनींचाच सण मानला जातो. त्यामुळे या सणासाठी विधवा महिलांना दूर ठेवून सुवासिनींनी हा सण साजरा करावा अशी प्रथा आहे. माणगांव तालुक्यात आपल्या कार्यपध्दतीने ज्यांनी नावलौकीक प्राप्त केले आहे असे कार्यसम्राट सरपंच विश्वास उभारे यांनी रुढी आणि परंपरेच्या बंधनात असलेल्या विधवा महिलांना मोकळा श्वास घेता यावा, स्वाभिमान आणि सन्मानाने जगता यावे यासाठी या रुढींना फाटा देत विधवा महिलांना सुध्दा कार्यक्रमात विशेष आमंत्रित करुन त्यांना हळदी कुंकवाचा मान व वाण देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील मागासवर्गीय व आदिवासी भगिनींना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी करून घेऊन एक सामाजिक समानतेचा व एकात्मतेचा आदर्श सरपंचांनी सर्वांसमोर निर्माण केला आहे. सरपंच विश्वास उभारे यांनी घेतलेल्या समाजाभिमुख निर्णयामुळे सर्वत्र त्यांचे कौतूक केले जात आहे. कोरोना काळात विशेष कामगिरी करणा-या शिक्षिका, अंगणवाडी सेविकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पैठणी विजेत्या महिला :-
सौ. रसिका रमेश उभारे, वर्षा वैभव मोरे, संस्कृती संतोष शिर्के, रेखा मदन आवाद, यसिका योगेश जाधव, मेघना मुंढे, विद्या विपुल उभारे, वैशाली नाडकर, प्रमिला राणे, निकिता शेलार , नंदिनी नाडकर, जयश्री करकरे, सुमन पवार, दिव्या दाजी मुंढे, वृषाली विठोबा उभारे, रंजना प्रमोद उभारे, मामिता पवार, शीतल सीताराम मुंढे , कल्याणी कमलेश शेडगे, अनिता शिर्के, लक्ष्मी केशव कानडे.





0 टिप्पण्या