मंगेश निर्मळ यांचा उत्कृष्ट मतदान अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव.
माणगांव-दि. २७- निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केली जाते. शिक्षक देखील आपल्या शिक्षण सेवेच्या कर्तव्यासोबत निवडणूक आयोगाचे काम देखील चोख बजावत असतात असेच एक शिक्षक म्हणजे नळेफोडी शाळेचे शिक्षक मंगेश निर्मळ.
मंगेश निर्मळ यांनी नळेफोडी शाळेचे शिक्षक असूनही माणगांव शहरातील १६९/६ उतेखोल मध्ये बी. एल. ओ. म्हणून काम पाहिले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल माणगांव तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांनी तालुक्यातील १८७ बी. एल. ओ. पैकी मंगेश निर्मळ यांची निवड केली.
दि.२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथील जे एस एम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रायगड जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन उत्कृष्ट मतदान अधिकारी (BLO) म्हणून मंगेश निर्मळ यांना गौरविण्यात आले. विशेष बाब म्हणजे मंगेश निर्मळ यांनी केलेल्या कामाचा भाग हा बहुतांशी शहरी आहे. या गौरवास्पद कामगिरी मंगेश निर्मळ यांच्या शिक्षण क्षेत्र व सर्व प्रशासकीय क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच मंगेश निर्मळ रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी देखील मेसेज वर शुभेच्छा देत कौतुक केले आहे.




0 टिप्पण्या