इंदापूर येथील शर्यतीत नितीन पाटोळे (नाणोरे) यांच्या मोन्या आणि संग्रामने पटकावला प्रथम क्रमांक

 इंदापूर येथील शर्यतीत नितीन पाटोळे (नाणोरे) यांच्या मोन्या आणि संग्रामने पटकावला प्रथम क्रमांक

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. २८- माणगांव तालुक्यातील इंदापूर (भिनाड) या ठिकाणी दि. २६ जानेवारी रोजी बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये एकूण ८७ बैलगाडी वाल्यानी सहभाग घेतला होता. शर्यत ही दोन गटात पार पडली मोठा गट व लहान गट.  तसेच ही शर्यत बिना काठी व बैलांना कोणत्याही प्रकारची इजा न होता पार पडली. शर्यतीत मोठ्या गटात १७ गाड्या होत्या. तर लहान गटात २५ गाड्या होत्या. माणगाव तालुक्यातील सर्व बैलगाडयांनी ह्या शर्यतीत भाग घेतला होता. त्यामध्ये मोठया गटात ओम पाटोळे (नाणोरे ) ह्यांच्या गाडीने टाइम रेकॉर्ड करत प्रथम क्रमांक पटकवला. 


गाडीचे ड्रॉयव्हर स्वतः दोन भाऊ नितीन पाटोळे व नितेश पाटोळे यांनी जीवाची बाजी करत आपली गाडी हाकलून हा मान मिळविला. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. तसेच द्वितीय क्रमांक ढेपे शेठ (लोणेरे) तृतीय क्रमांक संतोष भाई खडतर (चेरवली) चतुर्थ क्रमांक प्रथमेश शेळके (इंदापूर) पाचवा क्रमांक राज नितीन शिंदे (कोलाड) यांच्या गाडीने पटकवला. 

तर लहान गटात प्रथम क्रमांक पांडुरंग लहाने (लहाने सुरव) द्वितीय क्रमांक समीर साळवी (माणगांव) तृतीय क्रमांक वेद गुगले (निळगून) चतुर्थ क्रमांक इच्छा रंजित मोहिते (बोर्ले) पाचवा क्रमांक युनूस बडे (मोर्बा) यांनी पटकवला ही शर्यत पूर्ण माणगांव तालुका बैलगाडी संघटनेच्या उपस्थित पार पडली. संघटनेचे मार्गदर्शक समाधान दादा उतेकर, अध्यक्ष संतोष भाई खडतर, उपाध्यक्ष वासुदेव गुगले,, खजिनदार संजय शिंदे, पांडुरंग खडतर, दिलीप नवगुणे, रंजित मोहिते, तुषार करकरे तसेच सर्व बैलगाडी मालक व चालक उपस्थित होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या