श्रीवर्धन तालुक्यातील कुणबी युवा प्रतिष्ठान कार्यालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न.
पोलीस प्रवाह न्यूज
श्रीवर्धन : दि. १९ - श्रीवर्धन तालुक्यातील ८४ गाव कुणबी समाजाच्या युवकांकडून समाजकार्यासाठी कार्यालय उघडण्यात आले आहे.कुणबी युवा प्रतिष्ठान कार्यालयाचे उद्घाटन दि १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वरीष्ठ समाजनेते नारायण भोसलेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी समाज कार्यात आर्थिक सहाय्य मिळावा यासाठी प्रतिष्ठानने २०२३ दिनदर्शिका छापण्यात आल्या असून दिनदर्शिका प्रकाशन जेष्ठ समाज नेते नारायण भोसलेकर, पांडुरंग काप गुरुजी, लसू भायेजी, बोर्ली विभाग अध्यक्ष सीताराम साळवी, गोपाळ निवाते, महिला ता. अध्यक्ष रेणुकाताई जोशी, दिक्षाताई टाकले यांच्या हस्ते करण्यात आले.
कला-क्रीडा, सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य व समाजातील महिला-मुलीवर्ग यांचे सक्षमीकरण तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती पोचविणे व लाभ मिळवून देणे, हॉस्पिट, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालयातील अडीअडचणी सोडविण्यासाठी नूतन कार्यालय सुरू करणयात आले आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील प्रतिष्ठित व गावाचे अध्यक्ष तसेच पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संदीप लाड यांनी व कार्यक्रमाचे प्रस्तावना सोपान निंबरे व राजा टाकले यांनी केले.



0 टिप्पण्या