पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतवर बाळासाहेबांची शिवसेना व मनसेची सत्ता.
पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंच पदी संतोष वातेरे तर उपसरपंच पदी सुजन शिगवण बिनविरोध
माणगांव-दि.११- नुकत्याच पार पडलेल्या आणि माणगांव तालुक्यातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पदी बाळासाहेबांची शिवसेनेचे संतोष सिताराम वातेरे हे सरपंच म्हणून थेट जनतेतुन निवडून आल्यानंतर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व गाव, वाडी वस्त्यांचा विकास करण्याची प्रत्येकांना संधी मिळावी यासाठी सर्वानुमते उपसरपंच बदलण्याची प्रथा ठेवली आहे.यानुसार प्रथम दि. ११ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी सुजन शिगवण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सुजन शिगवण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाप्रमुख आहेत आणि तरुण व उमद्या उमेदवाराच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडल्यानंतर दक्षिण रायगड मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच संतोष वातेरे व उपसरपंच सुजन शिगवण यांचे उपस्थितानी अभिनंदन केले. दि.११ नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदा करिता सुजन शिगवण याचा एकमेव अर्ज प्राप्त होताच सर्व सदस्यानी एकमताने मंजुरी दिल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी प्रमोद नवाळे, करुणा जाधव, गैणी हिलम, महेश धाडवे, विजया वातेरे, मळेकर आदी सदस्य उपस्थित होते.
त्यावेळी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, संपर्क प्रमुख प्रताप घोसाळकर, सिताराम उभारे, विभाग प्रमुख रविंद्र टेंबे, लोणेरे सरपंच समाधान करकरे, उपविभाग प्रमुख संजय पवार, उपविभाग प्रमुख शेखर घोसाळकर शिवसैनिक तसेच यांनी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनसे चे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, मनविसे चे जिल्हा अध्यक्ष प्रतिक रहाटे यांनी दूरध्वनीद्वारे व प्रकाश टेंबे, राम भोस्तेकर, यांनी शुभेच्छा दिल्या.



0 टिप्पण्या