रायगड किल्ला बघून परतणाऱ्या बस चा अपघात.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. ११- रायगड किल्ला बघून परतताना बस चा आपघात झाल्याची घटना दि.११ नोव्हेंबर संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून सदर घटना हि माणगाव तालुक्यातील घरोशी वाडी रोड वर मिनी बस दरित कोसळून अपघात झाला. या बस मध्ये ३२ प्रवाशी प्रवास करीत होते.
ही बस रायगड किल्ला ते पुणे निगडी असे प्रवास करीत होती. पुणे निगडी तेथील मिनी बस रायगड किल्ला वर गेली होती परत येताना गाडी घारोशी वाडी येथे १२ ते १५ फूट दरीत गाडी जाऊन अपघात झाला आहे. सदर बस मधील ७ प्रवासी जख्मी झाले असुन तीन प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय आणले असून ४ प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचाड येथे हलवीण्यात आले आहे.




0 टिप्पण्या