रायगड जिल्हा सिनियर व सब ज्युनिअर टेनिसबॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा संपन्न

रायगड जिल्हा सिनियर व सब ज्युनिअर टेनिसबॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा पेण येथे संपन्न


पोलीस प्रवाह न्यूज
 
रायगड-दि. ६- महाराष्ट्र राज्य टेनिसबॉल क्रिकेट संघटना संलग्न भारतीय टेनिसबॉल क्रिकेट महासंघ मान्यता युवा कार्य, क्रीडा मंत्रालय,भारत सरकार तसेच भारतीय शालेय खेळ महासंघाची मान्यता प्राप्त तसेच स्पोर्ट्स कोटा मध्ये ही समाविष्ट असलेल्या टेनिसबॉल क्रिकेट या खेळाची ट्रॉफी फाईटर्स फाऊंडेशन व रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठगट (सिनिअर) व सब ज्युनिअर मुले व मुली यांची रायगड जिल्हा  टेनिसबॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन प्रायव्हेट हायस्कूल पेण मैदान, रायगड  येथे मोठ्या उत्साहात नुकतीच पार पडली. 

या स्पर्धेचे उदघाट्न रा. जि. प. मा. स. प्रभाकर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे संस्थापक क्रीडा महर्षी स्व. संतोष गुरव यांना श्रद्धांजली वाहून व  क्रिकेट खेळून सुरवात करण्यात आली. याप्रसंगी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त व संघटनेचे सचिव संदीप प्रल्हाद गुरव, ट्रॉफी फाईटर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर म्हात्रे, टेनिसबॉल क्रिकेट असो.चे उपाध्यक्ष किरण पाटील, टेक्नि.डायरेक्टर भरत गुरव, रायगड भूषण पुरस्कार प्राप्त रत्नाकर ठाकूर, ट्रॉफी फा. फाउंडेशनचे पदाधिकारी महेश म्हात्रे, सुशिल म्हात्रे, नरेश म्हात्रे, विनायक म्हात्रे, दिपक पाटील, जयदीप पाटील, दत्ता म्हात्रे सर, मानसी म्हात्रे, तृप्ती म्हात्रे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी मोठ्या संख्येने खेळाडू तसेच नागरिक उपस्थित होते.
         
उद्घाटना प्रसंगी रा. जि. प. मा. स. प्रभाकर म्हात्रे यांनी आपल्या भाषणांत सुरुवाती पासूनच क्रिकेट या खेळाची आवड असल्याने  या शासनाच्या मान्यता प्राप्त टेनिसबॉल क्रिकेट  निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले याचा मनापासून आनंद वाटतो. या स्पर्धेचे उद्घाटन करत असताना क्रिकेटशी संबंधित अनेक आठवणी जागृत झाल्या. सामाजिक काम करत असताना या खेळामुळे नेहमीच प्रेरणा मिळत असते. येथून निवडलेला रायगडचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळवत आपल्या भागाचे, रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर न्यावे अशी सदिच्छा व्यक्त करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे ट्रॉफी फाउंडेशन अध्यक्ष म्हात्रे यांनी आपल्या भाषणांत  विविध खेळांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेले क्रीडा रत्न व रायगड मधील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घडवलेले क्रीडा महर्षी स्व.संतोष गुरव यांनी आपल्या रायगड मध्ये ग्रामीण खेळाडू ऑलीम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त करण्यासाठी नेहमी झटत राहिले होते, त्यांनी अनेक खेळ स्वतः आत्मसात करून त्यात अनेक आंतराष्ट्रीय स्तरावर पदके संपादन करून रायगड जिल्हात टेनिसबॉल क्रिकेट संघटने सारखे अनेक संघटना निर्माण करून क्रीडा संस्कृती रुजवण्याचे कार्य केले होते. त्यांचे स्वप्न असलेले आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत आपल्या रायगडचे खेळाडू चमकविण्याचे कार्य पुन्हा सुरु झाल्या बद्दल गुरव सरांना खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजलीच देत आहात. असेच या राष्ट्रीय स्पर्धेत चमकून आपल्या रायगडचे नाव उज्वल करावे असे आव्हान सुधाकर म्हात्रे यांनी खेळाडूंना करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
 

या निवड चाचणी स्पर्धेतून निवडलेला रायगडचा संघ खालील प्रमाणे वरिष्ठगट (सिनिअर) मुले- निहार म्हात्रे(कॅप्टन), तुषार म्हात्रे, सचिन म्हात्रे, कुणाल निकम, राजा निसाद, शुभम म्हात्रे, अनुप पाटील, शंतनू परब, हर्षल म्हात्रे, आदित्य गदमले, सोहम म्हात्रे, राज पाटील, पियुष माळी, विशाल मालुसरे.
सबज्युनिअरगट - हर्ष म्हात्रे, अनुज पाटील, अर्याश पाटील, स्मित म्हात्रे, आशिष म्हात्रे, पार्थ वैशंपायन, जतीन पाटील, रिधम पाटील, सिद्धांत गुरव. 
टीम प्रशिक्षक - महेश म्हात्रे, टीम व्यस्थापक-भरत गुरव, हा निवडलेला रायगडचा संघ परभणी, प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे होणाऱ्या ७ व्या सिनिअर व  ६ व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करतील आणि या  राज्यस्तरीय स्पर्धेतून निवडलेले खेळाडू जम्मू-काश्मीर येथे दि.८ ते ११ डिसेंबर २०२२ रोजी  होणाऱ्या राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या