माणगांवात राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- युवासेना द. रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १७- आ. भरतशेठ गोगावले यांचे आदेशाने बाळासाहेबांची शिवसेना-युवासेना माणगांव तालुका यांचे तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर वाशिम येथील सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले सावरकरांनी इंग्रजांसाठी काम केले, इंग्रजांकडून पेन्शन घेतली, इंग्रजांनी सावरकरांना सांगितले आमच्यासोबत काम करा आणि सावरकर इंग्रजांसोबत देशाच्या विरोधात काम करायला तयार झाले या वक्तव्याच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना, युवासेना, माणगाव तालुका यांच्यातर्फे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी हाय हाय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या मनीशंकर अय्यर यांनी सुद्धा सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते त्यावेळी शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मणिशंकर अय्यर यांच्या पुतळाला जोडे मारून आंदोलन करण्यात आले होते, त्याच धर्तीवर बाळासाहेबांची शिवसेना युवासेना संपूर्ण महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या पुतळाला जोडे मारो आंदोलन करणार असून त्याची सुरुवात ही पहिल्यांदा रायगड जिल्ह्यात करण्यात आली. स्वातंत्र्यवीरांचा महाराष्ट्रातील महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून राहिली आहे, त्याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा, हिंदूंचा, हिंदुत्वाचा अपमान असून त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्र सह देशभरात संतापाची लाट पसरली आहे.
राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. आ. भरत गोगावले यांच्या आदेशाने बाळासाहेबांच्या स्मृती दिनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी व जिवंत ठेवण्यासाठी आम्ही हिंदुत्वावर आघात करणाऱ्यांविरोधात आंदोलन उभारले आहे असे विपुल उभारे यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना उपतालुकाप्रमुख नितीन पवार, युवासेना उपजिल्हाधिकारी अविनाश नलावडे, युवासेना जिल्हा सचिव अच्युत तोंडलेकर, युवासेना तालुका अधिकारी राजेश कदम, युवासेना तालुका सचिव जितेंद्र तेटगुरे, विभागप्रमुख योगेश बक्कम, सरपंच प्रकाश जंगम, युवा नेते मेहुल उभारे, शाखाप्रमुख जयेश कासारे, नितीन महाडिक, दिनेश शेलार, मनीष कोकाटे, अमित नलावडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.



0 टिप्पण्या