शेकाप तर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार समारंभ तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जण करणार शेकपमध्ये पक्ष प्रवेश

 शेकाप तर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार समारंभ

तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जण करणार शेकपमध्ये पक्ष प्रवेश



पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि.१७-  माणगांव तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. एस. एस. हायस्कुल मोर्बा येथे करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला शेकापचे सर्वेसर्वा आ. जयंत पाटील, मा. आ. धैर्यशील पाटील, मा. आ.पंडित पाटील, जिल्हा चिटणीस ऍड. आस्वाद पाटील, आरडीसी बँक व्हा. चेअरमन सुरेश खैरे, जे. बी. सावंत ए. सो. चेअरमन नाना सावंत, आरडीसी बँक संचालक अस्लम राऊत, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, मा. जि. प. स. आरती मोरे, सुशिल कदम, अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या देगाव ग्राम पंचायत निवडणुकीत शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापने एकतर्फी विजय संपादित केला. त्यांचा सत्कार करण्यासाठी तसेच पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या