सह्याद्री देवराई सिध्दनेर्ली येथे २०१ वृक्षांचे लागवड.

 सह्याद्री देवराई सिध्दनेर्ली येथे २०१ वृक्षांचे लागवड.


पोलीस प्रवाह न्युज

जिल्हा प्रतिनिधी - विवेक पोतदार 

    सिध्दनेर्ली : दि. ८ - सह्याद्री देवराई चे प्रणेते सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या सह्याद्री देवराई या उपक्रमाअंतर्गत सिध्दनेर्ली येथे सुरू असलेल्या अतिक्रमण मुक्त पाणंद करून पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून संगोपन सुरू आहे.त्यामध्ये आज ग्रामपंचायत सिध्दनेर्ली,सह्याद्री देवराई प्रणित निसर्ग व पर्यावरण संघटना व समाज विकास केंद्र सिध्दनेर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आज २०१ वृक्षांचे रोपन केले.सिध्दनेर्ली चे लोकप्रिय सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते वृक्ष लावून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सह्याद्री देवराई सिध्दनेर्ली प्रमुख मधुकर येवलुजे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उमेश मगदूम ,गडकरी सर हसुर ,बटु शिरोळे यांनी आपले मनोगते व्यक्त केली.

यावेळी पत्रकार कृष्णात पाटील (मुंबई),तसेच बटु शिरोळे (करनूर), गडकरी सर (हसुर ग्रामस्थ) ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, कृष्णात मेटील, स्वप्नील माने (IPS)अधिकारी,राजु घराळ,कॉ.शिवाजी मगदूम ,विवेक पोतदार, बी.जी.पाटील,पवन पोवार यांच्या सह वृक्षमित्र व ग्रामस्थ उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या