वनदेवतेचे पूजन आणि आदिवासी स्त्रियांची ओटी भरून वनविभागाने वन्यजीव सप्ताहाची केली सुरुवात

वनदेवतेचे पूजन आणि आदिवासी स्त्रियांची ओटी भरून  वनविभागाने वन्यजीव सप्ताहाची केली सुरुवात

पोलीस प्रवाह न्यूज

माणगाव : दि. २  ऑक्टोबर 2022 रोजी पन्हळघर बुद्रुक येथील आदिवासी वाडी येथे वन्यजीव सप्ताहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने वनदेवतेची पूजा करून स्थानिक आदिवासी वाडी येथील महिलांचा सत्कार करून पूजेनिमित्त आणलेल्या सामानाने त्यांची ओटी भरण्यात आली. आदिवासी समाज हा मुख्यतः निसर्गपूजक आणि जंगलाचे रक्षण करणारा समाज असल्याने वनविभाग आणि जंगला नजीकच्या आदिवासी बांधवांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा सहकार्याचा बंध वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने माणगाव वन परिक्षेत्रातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


आदिवासी महिलांच्या सत्कार आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमानंतर नवरात्रीच्या निमित्ताने आदिवासी महिलांनी सुरेख असे फेर धरून पारंपारिक नृत्य देखील सादर केले. सदर कार्यक्रम हा वनरक्षक रूपाली पवार यांच्या संकल्पनेतून आयोजित केला गेला कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन वनरक्षक दीपक तेटगुरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल श्री अनिरुद्ध ढगे यांनी सह परिवार उपस्थिती दर्शवली.

या प्रसंगी शृंखला या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता शर्मा संस्थेच्या इतर सदस्यांसमवेत उपस्थित होत्या तर पन्हळघर परिमंडळ अधिकारी श्री सुजित राजमाने,वनरक्षक सुनीता वडजे, अनिल मोरे,अक्षय मोरे व इतर वन कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या