खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते निजामपूर विभागात विविध विकासकामांची भूमिपूजने व उदघाटने.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. ३- राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निजामपूर विभागात विविध विकासकामे केली जात आहेत. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये निकालानंतर निजामपूर विभागातील घड्याळाचा आवाज हा महाडच्या ढालकाठी पर्यंत जाईल, असे रायगड रत्नागिरी लोकसभा खा. सुनील तटकरे यांनी दि. ३ सप्टेंबर रोजी निजामपूर विभागात झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उदघाटन प्रसंगी केले. यावेळी जावटे, भाले येथे नळपाणी पुरवठा भूमिपूजन, पाणसई येथे सामाजिक सभागृह उदघाटन व नळपाणी पुरवठा भूमिपूजन, चांदेवाडी येथे नळपाणी पुरवठा भूमिपूजन, कोस्ते खुर्द येथे हनुमान मंदिर सभागृह व नळपाणी पुरवठा भूमिपूजन, कोस्ते बुद्रुक येथे सामाजिक सभागृह व नळपाणी पुरवठा भूमिपूजन, निजामपूर येथे वाढीव नळपाणी पुरवठा योजना व तलाव सुशोभीकरण भूमिपूजन, बोंडशेत मानकरवाडी येथे रस्ता तसेच शिरवली, कांदळगाव खुर्द, तासगाव, विळे वरचीवाडी, बेडगाव येथे नळपाणी पुरवठा भूमिपूजन, विळे येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन ई. विकासकामांची भूमिपूजने व उदघाटने खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाड-पोलादपूर-माणगांव विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर खानविलकर, उपाध्यक्ष प्रसाद गुरव, निजामपूर विभाग अध्यक्ष संदिप जाधव, रायगड जिल्हा युवक उपाध्यक्ष अनंता महाडिक, सुभाष दळवी, ग्रा. पं. पाणसई सरपंच रुचिता धाडवे, काशीराम पवार, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, रा. कॉ. निजामपूर विभाग महिला अध्यक्षा देविका पाबेकर, सचिव किरण पागार, युवक तालुका उपाध्यक्ष संजय घाग, मिलिंद फोंडके, सागर खानविलकर, विळे सरपंच गजानन मोहिते, निलेश वांजळे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणसई येथे झालेल्या सभेत संपूर्ण पाणसई गावाने शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खा. सुनील तटकरे, बाबूशेठ खानविलकर यांच्या कार्यप्रणालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले. तसेच कोस्ते खुर्द येथे खा. सुनील तटकरे यांचे स्वागत गावातील महिलांनी रोडच्या दुतर्फा उभे राहून फुलांचा वर्षाव करीत घोषणा देत केला. आम्ही आमच्याच कामांचे भूमिपूजन करतो. कोस्ते नळपाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर केली आहे. ही योजना दि. ४ ते ६ जुलै दरम्यान मंजूर झाली आहे. तेव्हा बाकी नेते गुवाहाटी, सुरत की आणखी कुठे होते हे तपासून पहा.
बाबूशेठ खानविलकर यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून ते पायाला भिंगरी बांधून या मतदारसंघात विकासकामे करीत आहेत. महाविकास आघाडी सरकार हे आमचं हक्काचं सरकार होतं. खानविलकर यांच्यामुळे विरोधकांची धावपळ नाहीतर दमछाक होणार आहे. निजामपूर विभागात बाबूशेठ खानविलकर करीत असलेल्या कामांचे खा. तटकरे यांनी कौतुक केले. काही जण सांगतात की, पालकमंत्री हटाव ही मोहिम आम्ही यशस्वीरित्या पार पडली. अरे तुमच्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला पायउतार व्हावं लागलं. याशिवाय दुसरं कोणतं दुर्दैव नाही. आयुष्यभर वेगवेगळा रंगमंच फिरणाऱ्या लोकांना विभागीय अध्यक्ष यांनी चांगली उत्तरे दिली आहेत, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच नाव न घेता खा. तटकरे यांनी लगावला. घोडशेतवाडी येथील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.






0 टिप्पण्या