माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची बदली; संतोष माळी माणगांवचे नवीन मुख्याधिकारी

 माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची बदली; संतोष माळी माणगांवचे नवीन मुख्याधिकारी



पोलीस प्रवाह न्यूज

माणगाव-दि. २२   माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची बदली झाली असून संतोष माळी हे बदलीने रिक्त झालेल्या पदावर रुजू झाले आहेत. याआधी संतोष माळी उरण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत होते. आज बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी संतोष माळी यांनी माणगाव नगरपंचायतीचा पदभार स्वीकारला आहे.


       महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) व ४ (५) मधील तरतुदीनुसार, मुख्याधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने ही बदली करण्यात आलेली आहे. राहुल इंगळे यांची अचानक बदली झाली आणि त्यांचा नगरपंचायत कर्मचारी यांनी केलेला निरोप कार्यक्रम देखील गुलदस्त्यात ठेवण्यात आला याबद्दल विशेष गुप्तता बाळगलेली पाहायला मिळाली.
        राहुल इंगळे यांचा माणगांव शहरातील कारभार "कभी खुशी कभी गम" अशा स्वरूपाचाच पाहायला मिळाला आहे. शहराचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी या हे शहराचे विकासाची महत्वाची भूमिका बजावत असतात ही विकासाची दोन चाके मानली जातात. आता नवीन आलेले मुख्याधिकारी संतोष माळी यांना सोबत घेऊन नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी शहरातील नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सत्ताधारी आणि विरोधकांना सोबत घेऊन, राजकीय हेवे देव्याचे निरसन करून शहराचा विकास करावा असे सुजाण नागरिकांचे मत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या