प्रतिनिधी -विवेक पोतदार
सिद्धनेर्ली ता.कागल येथील ओजस हाॕस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले.यावेळी काॕम्प्युटराइज्ड नेत्र तपासणी,काॕन्टॕक्ट लेन्स,बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ,फोल्डेबल लेन्स,मधुमेह नेत्रपल निदान,काचबिंदु निदान याबाबत तपासणी करण्यात आली असल्याचे ओजस हाॕस्पिटलचे प्रमुख डाॕ.अरुण पोवार यांनी सांगितले.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी पल्स हाॕस्पिटलचे नेत्ररोग तज्ञ डाॕ.प्रिती मेहता,प्रविण कुंभार,आशा पाटील,रोहिणी पोवार,नम्रता पोवार यांनी परिश्रम घेतले.
यावेळी शंभरहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला.


0 टिप्पण्या