अक्षरशिल्पचा बाल मार्गदर्शक कु.भवित सुविधा चंदन तोडण कर पहिल्या राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित.

अक्षरशिल्पचा बाल मार्गदर्शक कु.भवित सुविधा चंदन तोडण कर  पहिल्या राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित.


 पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव : दि. ३१ - दिनांक 28 व 29 मे 2022 पंढरपूर येथे  पहिले राज्यस्तरीय अक्षर संमेलनत आयोजित करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या संमेलनात सुमारे 350 अक्षर प्रेमींनी आपल्या कलाकृती सह  आपला सहभाग नोंदवला होता.यात अक्षरशिल्पचा बाल मार्गदर्शक कु.भवित सुविधा चंदन तोडण कर  पहिल्या राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  'माझी शाळा माझा फळा' या व्हाट्सअप समूहाद्वारे या संमेलनाचं आयोजन श्री अमित भोरकडे या अक्षर प्रेमी कलाकाराने आपल्या सहकाऱ्यांसह स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. अक्षर चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या 30 गुणी कलाकारांना  अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. यामध्ये संपूर्ण कोकण विभागातून निवड करण्यात आलेल्या बाल सुलेखनकार म्हणून अक्षरशिल्प हॅन्ड रायटिंग अकॅडमी,  महाड चा बाल मार्गदर्शक कु.भवित सुविधा चंदन तोडणकर  पहिल्या राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 कुमार भावित हा वयाच्या 4थ्या पासून दोन्हीही हाताने लेखन व चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करीत आला आहे. त्याने आत्तापर्यंत सुमारे 150 शाळा मधून प्रात्यक्षिक सादर केले होते. त्याचे प्रात्यक्षिक पाहून अनेक विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व एकाग्रतेने दोन्ही हाताने लेखन करायचे कौशल्य आत्मसात केले.

 या संमेलनात त्यांनी सादर केलेल्या एकाच वेळी तोंडाने व दोन्ही हाताने लेखन कौशल्य व  तोंडाने साकारलेली विठुरायाची प्रतिमा उपस्थित कलाप्रेमीची दाद मिळवून गेली. उपस्थित मान्यवरांनी त्याचे करून त्याच्या कलेचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या. त्याच्या या कलेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून. अक्षर्शिल्प परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र महाडिक यांनी पंढरपूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यास प्रोत्साहन दिले. त्याच्या यशामध्ये  त्याचे कलाप्रेमी पालक श्री चंदन व सौ.सुविधा   तोडणकर यांच्या मोलाचा वाटा  आहे. समर्थ कृपा कुटुंबीयांचे आशीर्वाद मार्गदर्शक शिक्षकांचे सहकार्य यामुळेच मला हे यश मिळाले असे त्यांनी सांगितले त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या