ता. ३०- आज कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) प्रणित इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो (IIJS) यांचा रोड शो कार्यक्रम हा दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग येथे संपन्न झाला.
मुंबई (गिरगाव) येथे दि. ४ ते ८ ऑगस्ट २०२२ रोजी ज्वेलरी, मौल्यवान रत्ने, दागिने, मशिनरी यांचे भव्य प्रदर्शन IIJS भरवते त्यात कोल्हापुरातून होलसेलेर भाग घेत असतात तर सुमारे ५०० च्या वर सराफ/सुवर्णकार व्यावसायिक हे भेट देत असतात, याच धर्तीवर आज त्यांचा रोड शो हा भरविण्यात आला होता...
यावेळी GJEPC चे डायरेक्टर श्री. शामल पोटे, असिस्टंट डायरेक्टर कु. नाहीद सनके मॅडम, मॅनेजर GJEPC कु. अनु कोडगुले, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. राजेश राठोड, उपाध्यक्ष श्री. विजय हावळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी संस्थेचे सचिव श्री. प्रीतम ओसवाल आणि तेजस धडाम यांनी सूत्रसंचालन केले तर मांडणी व कार्यक्रम रूपरेषा नितीन ओसवाल आणि शितल पोतदार यांनी केले...
GJEPCचे उपस्थित मान्यवर यांनी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली आणि प्रदर्शसनचे फायदे सांगितले तर अध्यक्षीय भाषणात राजेश राठोड यांनी सर्वांनी प्रदर्शसनच लाभ घ्यावा अल्प दारात नोंदणी सुरू असून त्यांला चांगला प्रतिसाद लाभला...
यावेळी दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगचे बिनविरोध निवडून आलेल्या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांचा सत्कार सराफ संघाच्या वतीने करण्यात आला...
यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे संचालक सर्वश्री कुलदीप गायकवाड, किरण गांधी, ललित ओसवाल, कुमार ओसवाल, अशोककुमार ओसवाल, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, भैरू ओसवाल, सिद्धार्थ परमार, शिवाजी पाटील उपस्थित होते.



0 टिप्पण्या