प्राण जाये पर वचन न जाये-ना. आदित्य ठाकरे

 प्राण जाये पर वचन न जाये-ना. आदित्य ठाकरे.

प्रेमाने आलात तर बाजूला बसवू, जर तलवार घेऊन आलात तर वार परतविण्याची ताकद आमच्यात आहे. 

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. ३० - गेली २ वर्ष महाराष्ट्रातील विरोधक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर रोज दररोज खोटे नाटे आरोप करून अनाठायी बदनामी करीत आहेत. त्यांचे षडयंत्र आहे. त्यांची पोटदुखी सुरू आहे.  त्याला आम्ही भीक घालणार नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. ती तुटन शक्यच नाही. महाराष्ट्राला दिलेली वचने आणि आश्वासने पाच वर्षात पूर्ण करून दाखवू. प्रेमाने आलात तर प्रेमाने बाजूला बसवू. जर तलवार घेऊन आलात तर तो वार परतविण्याची ताकद आमच्यात आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण न करता महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास आघाडीने घेतला आहे. 'प्राण जाये पर वचन न जाये' या युक्तीप्रमाणे दिलेली आश्वासने पूर्ण करणारच. कोणीही आमच्यावर चालून आला तर झुकणार नाही, वाकणार नाही. आम्ही विकासकामे करीतच राहणार. समोर बसलेली भगवी ताकद व एकजूट दिल्लीत बसलेल्या विरोधकांनी पाहिल्यास आमची खरी ताकद समजेल असे भाजपचे नाव न घेता ना. आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावले. 

      कोकणावर निसर्गाची देणगी आहे.   कोकणात पर्यटनास मोठी संधी आहे. त्यामुळे विविध विकास योजनेतून निधी उभारला जात आहे. मात्र दोन वर्षे कोविड काळात विविध माध्यमातून कोविडवर मात करण्याची काम यशस्वीपणे सरकारने केले आहे. सध्या बेरोजगारी, महागाई वाढलेली आहे. तसेच डिझेल, पेट्रोलचे भाव वाढत आहेत. मात्र राज्य सरकारने सी. एन. जी. वरील टॅक्स कमी करून सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. दरम्यान रायगडमध्ये दोन-दोन वादळे, अवकाळी पाऊस, गारपीट, महापूर या नैसर्गिक आपतींचा रायगडकरांनी जिद्दीने सामना केला. त्यांच्या या जिद्दी पुढे मी नतमस्तक होत आहे. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधींची मदत करून आपतिग्रस्तना मोठा दिलासा दिला आहे. तब्बल १ हजार ४० कोटी रुपयांचे पॅकेज मदत म्हणून देण्यात आले. रायगडसाठी येत्या जून महिन्यात भव्य रोजगार मेळावा आयोजित करणार असून रायगडला मुंबईला जोडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाचे मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले असून, या शासनाच्या माध्यमातून कोकणाचा शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणार अशी ग्वाही पर्यटन पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले आहे. माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे २०% राजकारण व ८०% समाजकारण करून विकासाची गंगा आणणार आहोत. 

   रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे ३ वाघ आमदार झाले आहेत. आगामी निवडणुकीत या आमदारांमध्ये वाढ कशी होईल यासाठी संघटनात्मक प्रयन्त केल्यास रायगड जिल्ह्यात ७ पैकी ७ आमदार निवडून येऊ शकतात. येत्या रायगड जि. प. निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होऊन जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे ध्येय ठेवूनच आतापासून कामाला लागावे. रा. जि. प. चा अध्यक्ष हा शिवसेनेचाच होईल असा आत्मविश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई  यांनी माणगांव येथील शिवसेना मेळाव्यात व्यक्त केला. त्यानंतर शिवसेनिकांनी टाळ्यांचा मोठा कडकडाट करून त्यांना दाद दिली. त्यामुळे तमाम उपस्थित असणाऱ्या तमाम शिवसैनिकांमध्ये आनंद व उत्साह संचारला होता. 

   राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत आज माणगांव शहरातील जे. बी. सावंत, टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालय बामणोली रोड येथे दु. ५ वा. शिवसेनेचा जाहीर मेळावा संपन्न झाला. शिवसंपर्क अभियाना अंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांचा अश्वारूढ पुतळा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभरण्याचे आश्वासन दिले. 

   ना.आदित्य ठाकरे हे बुधवार, दि. ३०  मार्च रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर होते.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात इक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमिपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाच्या भूमिपूजन करण्यात आले.

    या मेळाव्याला मुंबई रिपेअर बोर्ड अध्यक्ष विनोद घोसाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,  आ. प्रकाश सुर्वे, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे,  शिरीष घरत, मनोहर भोईर, जिल्हा युवा सेना अध्यक्ष विकास गोगावले, महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, दिपश्री पोटफोडे, सुवर्णा करंजे, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, संपर्क प्रमुख सदानंद थरवल, विलास चावरी, माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील, ऍड. राजीव साबळे,  डॉ. संतोष कामेरकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, सर्व नगरसेवक, ई. मान्यवर उपस्थित होते.  यावेळी निजामपूर विभागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ना. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच माणगांव नगर पंचायत शिवसेनेचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांचा सत्कार ना. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या