अकलूज पोलीस स्टेशन हद्दीत 'नो कंप्लेंन डे' मोठ्या उत्साहात साजरा

 

अकलूज - प्रतिनिधी 

अकलूज येथे आज दिनांक ६ मार्च २०२२ राेजी  पोलिस मित्र परिवार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने अकलूज पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये 'नो कंप्लेंट डे 'साजरा करण्यात आला.यामध्ये अकलूज पोलिस स्टेशन,ग्राम सुरक्षा दल,सर्व पोलीस मित्र,राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व प्रहार संघटना सर्व व्यवसाईक,सामाजीक कार्यकर्ते यांचे वतीने आयोजन करण्यात आले होते.

           अकलूज पोलिस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक मा. अरूण सुगावकर यांचे शुभ हस्ते नो कंप्लेंट डे च्या एक दिवसीय तक्रार निवारण कक्षाचे  उद् घाटन करण्यात आले.यावेळी पोलीस मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक  रमेश सुरवसे पाटील,राज्य संघटक विष्णू आंधळकर,यूवा अध्यक्ष बाळासाहेब कांबळे ,प्रवक्ते भिमरावचंदनशिवे ,पोलीस मित्र परिवाराचे कार्यकारणी सदस्य शहाजीराव माने देशमुख उपस्थित होते.आज अकलूज पोलीस स्टेशनमध्ये सकाळी ०६।०० ते सायं ०६।०० वा पर्यंत  एक ही तक्रार दाखल झाली नाही.ही बाब उल्लेखनीय व पाेलीस दलासाठी व न्यायालयासाठी समाधानाची व पाेलीस परीवारासाठी अभिमानाची बाब आहे.

त्यामुळे आज पोलिस स्टेशनचा परिसरात व पाेलीस कर्मचारी वर्गात निरव  शांतता हाेती  व मनाेमन समाधान व  आनंद  पसरला  होती.एरव्ही गजबजलेले असणारे  पोलीस स्टेशनमध्ये आज मात्र  शुकशुकाट पसरलेला होता.

यापुर्वीच अकलूज पोलीस स्टेशनने बहुतांशी केसेस सामजास्यातून सोडल्यामुळे दोन्ही पार्टींचे समाधान होत असल्यामुळे होणारा कोर्टाचा वेळ व आर्थिक खर्च व मानसिक त्रास वाचला आहे.त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अकलूज पोलीस स्टेशनच्या व पाेलीस मित्र परीवार नेहमीच संयूक्त विद्माने विविध समाज उपयोगी व माेलाचे  उपक्रम व कार्यक्रम  राबवित असते.त्यात आज मात्र भरीव कार्याची भर पडली आहे 

या नाे कंमप्लेन डे ची गरज आज जगाला आहे व हा उपक्रम राबवणे काळाजी गरज झाली आहे,आज सामान्य माणसाचा ,पाेलीस आणि काेर्टाचा वेळ व पैसा  महत्वाचा व माेलाचा आहे ताे आज 

नाे कंमप्लेन डे च्या दिवशी वाचला आहे ही बाब महत्वाची आहे असे प्रतिपादन परीवाराच्या वतीने सूरवसे पाटील यांनी सांगितले आहे .लवकरच संपूर्ण जिल्हासह राज्यात हा उपक्रम राबविला जाईल असेही सांगितले 

  या कार्यक्रमाला रूपाली खुशालचंद गांधी, सिध्देश्वर शिंदे सूनिल खांडेकर विश्वजीत सूरवसे पाटील , रूपेश कूमार  आयवळे,मंगेश बुराडे,सचीन भाेसले,सूनिल भगत, हनूमंत शेगर,सचिनकांबळे,इन्नूस फकीर,श्रीकांत धनवडे,नागन्नाथ गेजगे,मनोहर गायकवाड,प्रविण फुले,नंदकूमार  कांबळे,रशिदशेख,मंगेश पांढरे,सुनिल खांडरे ,सुधीरगिरी,हणमंत गरड,विकी बनसोडे,सचिन जाधव,राजेंद्र जाधव,भैय्या शिरतोडे,चैतन्य पोतेकर,राहूल वाघंबरे,सुभाष पवळ व सर्व पोलीस मित्र परिवाराचे यशवंतनगर संग्रामनगर व माळीनगर यांचेसह राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व विद्यार्थी,सर्व ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य,प्रहार संघटनेचे सर्व सदस्य व ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या