अवैध वाळू उत्खनन, प्रकरणी उणेगाव येथे महसूल विभागाची कारवाई
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव: दि. ३० - माणगाव तालुक्यातील मौजे , उणेगाव हद्दीत अनेक दिवस चोराटी रेती उत्खनन चालू असल्याचे समजले आसता निवासी तहसीलदार भाबड, मंडळ अधिकारी सानप व तलाठी कर्मचारी सह यानी धडक छापा टाकून करवाई केली. सदर ठिकाणी सहाजण व्यक्ती चोरटी उत्खनन करीत असल्याचे आढळले.अवैध वाळू उत्खनन करणारांविरोधात महसूल विभाग आक्रमक झाले असुन मागील महिन्यात देखील अवैध रेती प्रकरणी महसूल विभागाने तीन ठिकाणी करवाई केली होती.
सविस्तर वृत्त असे की, मौजे उणेगाव तालुका माणगाव येथे अवैधरित्या वाळू उत्खनन करून, ती विकत असल्याचे समजले असता महसूल विभागाने धडक करवाई करुन तेथील सहा मोटार पंप व तीन ब्रास रेती व सहा ब्रास रेजगासह मुद्देमाल या पथकाने जप्त करित, बेकायदा वाळू उपसा करणारांवर दंडात्मक कारवाई केली. सदर ठिकाणी 1) दिपेश यशवंत सत्वे 2)अनिल सत्वे 3)संजय सुरेश जुमारे 4)सदाशिव जूमारे 5)चंद्रकांत सत्वे 6)लक्ष्मण सत्वे .हे चोरटी वाळू उत्खनन करीत असल्याने त्याच्यावर दंडात्मक करवाई करण्यात आली आहें.




0 टिप्पण्या