कुणबी समाज बत्तीशी विभागाच्या गोरेगाव दत्तमंदिराच्या पुरातन दोन शिला सापडल्या - सिताराम उभारे.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव: दि. २७ - माणगांव तालुक्यातील लोणेरे गोरेगांव परिसरात मोठ्या प्रमाणात कुणबी समाज असून कुणबी समाजाचे श्रध्दास्थान असणाऱ्या गोरेगाव येथील दत्तमंदिर हे शिवकालीन असून ते दत्ताचे मठ म्हणून प्रसिद्ध होते. ते मोडकळीस आल्याने समाजबांधवांनी सन 2000 मध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची व इतर कोणाची हि मदत नवीन घेता समाजबांधवांनच्या साठविलेल्या पुंजीतून नवीन बांधकाम करण्याचे ठरविले होते. यावेळी दोन पुरातन शीला बांधकाम करताना सापडल्या होत्या तेव्हा सिताराम उभारे यांनी समाजबांधवांनच्या व मंदिर कमिटीच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु तात्काळीन अध्यक्षानी याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे समाजबांधवांन मध्ये नाराजी वेक्त केली जात असल्याचे सिताराम उभारे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की सदर अध्यक्ष यांच्या पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिले असल्याचे म्हणाले.
गोरेगाव दत्तमंदिर हे एक कुणबी समाजाचे श्रध्दास्थान असणाऱ्या (दत्त मठ) म्हणून या विभागात प्रसिद्ध आहे.या वास्तूचे जतन केले गेले पाहिजे असे मत मांडले आज पुन्हा एक दुष्टटांत झाला याचा मी गेली दोन दिवसापासून शोध घेतल्या नंतर या दोन्ही शिला मला धुळ खात पडल्याचे निदर्शनास आल्या मी भाग्यवंत असून मला योगायोगने 22 वर्षानी या शिला सापडल्या मी याचा मला फार मोठे आनंद झाले आहे. मी हि सर्व हकिगत आमच्या कुणबी समाज देवस्थान कमिटीच्या निदर्शनास आणुन दिले असून तातडीने या विषयावर चर्चा करण्यासाठी सभा बोलावून या विषयाबद्दल समाज थरावर योग्य पद्धतीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. माणगाव तालुक्यात गोरेगाव या ठीकाणी असणारे दत्तात्रय देवस्थान म्हणजे दत्त महाराज यांचा मठ आणि या मठाची स्थापना शके सन 1667 साली चे शिवकालीन हे मठ आहे. या मठाची संपूर्ण माहिती बूवाची जत्रा या जत्रशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहात समाजबांधव जत्रा करत असतात परंतु गेली दोन वर्षे कोरोना संकटा मुळे मोजक्याच समाजबांधवांनच्या उपस्थित जत्रा पार पडलेल्या परंतु या वर्षी शासनाने नियम सिथिल केल्याने या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात बुवाचीजत्रा उत्साव समाजबांधवांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न होणार आसल्याचे सांगितले.त्यामुळे या सर्व गोष्टी विचार केला तर हे मंदिर शिवकालीन पुरातन आहे .हे या शिला सापडल्या आहेत त्यावरून दिसत आहे. या सापडलेल्या शिला योग्य प्रकारे जतन करण्यासाठी समाजबांधवानी पावले उचलली असल्याचे सिताराम उभारे आणि अरूण चालके यांनी प्रसिध्दी माध्यमाना सांगितले आहे.





0 टिप्पण्या