मुरगुड शहरामध्ये १ फेब्रुवारीनंतर प्लास्टिकबंदी मोहीम तीव्र - मुख्याधिकारी हेमंत निकम
कागल प्रतिनिधी/ओंकार पोतदार
येत्या १ फेब्रुवारीनंतर मुरगुडात प्लास्टिकबंदी मोहीम तीव्र करण्यात. येणार असून नियमांचे उलंघन केल्यास दुकाने सीलबंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी दिली आहे.
प्लास्टिकबंदी असणाऱ्या ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या (कॅरीबॅग), प्लास्टिकचे ताट, कप, ग्लास, प्लेट्स इत्यादी वापरण्यास मनाई केली आहे. प्लास्टिकबंदीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच अशा आस्थापनांना अनिश्चित काळासाठी सीलबंद केले जातील. त्यांचे व्यवसाय परवाने रद्द करण्यात येतील. मुरगूड शहरामध्ये प्लास्टीक बंदीची पथके शहरामध्ये गस्त घालत असून आतापर्यंत प्लास्टीक जप्त करुन - दंडात्मक कार्यवाहीसुद्धा केल्या आहेत. १ फेब्रुवारीनंतर शहरामध्ये तीव्र मोहीम राबविण्यात येणार आहे.

0 टिप्पण्या