करमाळा - राज्यात पोलीस महाभरती घेऊन पोलिसांवरचा ताण कमी करावा - पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर

 

प्रतिनिधी - करमाळा


दररोज वर्तमान पत्र उघडले की पोलीस दला विषय काही न काही बातम्या असतात ,थोड्याच चांगुलपणा च्या पण जास्त विरोधातच असतात ,त्यातच वरिष्ठांचे जाचास कंटाळून महिला किंवा  पुरुष पोलीसाची  आत्महत्या ,आपण बातम्या वाचतो आणि तात्पुरती हळहळ करतो ,मधेच विचार करतो बरे झाले हे पोलीस वाईटच असतात ,कधीतरी आपण  गाडीवर्ती ,जात असताना पोलिसांनी अडवून दंड केलेला राग आपल्या मनात असतो ,परंतु वस्तुस्तिथी चा विचार आज लोक का करत नसतील याच आश्चर्य वाटते ,दररोज हजारो मोर्चे ,उपोषण ,आंदोलने ,निवडणुका ,सभा ,कोरोना सारखी महामारी ,संचारबंदी ,नेते मंडळी चे दौरे राजकीय दबाव  हा सगळा ताण पोलिसांना सहन करावा लागतो  तालुका जिल्हा पोलिस स्टेशन ,ला असणारी पोलिसांची तूटपुंजी संख्या यामुळं डबल ड्युटी चा ताण एकाच कर्मचाऱ्यावर येतो ,व डुयटी संपली असताना ही वरिष्ठांचे आदेशाने आणीबाणी त कर्तव्यावर हजर राहावं लागते त्यामुळे मनावर प्रचंड ताण असतो दुरीकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांचा पण नाईलाज असतो ,अपुरी कर्मचारी संख्या व एकाच शहरात दैनंदिन घडणाऱ्या गोष्टी ,अचानक उदभवणारी आपत्कालीन परिस्थिती ,त्यामुळं त्यांना कर्मचाऱ्यांना ना इलाजने ,ड्युटी वरती हजर करायला लागते ,याच मुख्य कारण म्हणजे पोलिसांची असणारी अपुरी संख्या ,जर देशात राज्यात पोलीस महा भरती करून  कर्मचारी संख्या वाढवली तर नक्की च पोलीस बांधवांचा कामाचा ताण कमी होईल मानसिक स्वास्थ्य लाभलं ,आत्महत्या होणार नाहीत आज राज्यात पोलिसांच् अनेक प्रश्न प्रलनबीत आहेत ,त्यांचे निवासाचा मुख्य प्रश्न आहे पोलीस वसाहतीतील घर जुनी व जीर्ण झालेली आहेत  पाहिजे त्या,सुखसुविधा मिळत नाहीत ,त्यामुळे पोलीस स्टेशन पासून दूर भाडोत्री घर शोधत बसायची वेळ येत आहे ,एक  तालुक्याचे मानाने 2 पोलिस निरिक्षक 2 उपनिरीक्षक  व कॉन्स्टेबल अशी बोटावर मोजण्या इतकी संख्या असते ,मग एवढ्या अपुऱ्या संख्येत तालुक्यातील 36 गावात कसे काय लक्ष देता येणार ,हा मुख्य प्रश्न आहे ,मुख्य म्हणजे कर्मचारी संख्या कमी असल्याने ,आहे त्या पोलीस बांधवांवर खूप ताण येत असतो ,कामाचे प्रचंड ताणामुळे पोलीस नागरिकांशी ,कडक धोरण राबवतात त्यामुळे लोकांना पोलिसांचा राग येतो त्याचेंबद्दल द्वेष निर्माण होतो ,पण हा ही विचार लोकानी करायला हवा.

  आज पोलीस नसतील तर काय होईल राज्यात देशात ,याचा बारकाईने जरा तरी विचार आपण करायला हवा ,दिवसाला कित्येक बलात्कार ,कित्येक खून कित्येक दरोडे ,लूटमार ,चोऱ्या ,फसवणूक ,आशा अनेक घटना राजरोस घडतील ,तेव्हा पोलिसांच महत्व जनतेला नक्की कळेल ,वर्षाचे 12 महिने आपले पोलीस प्रशासन राबत असते ,आपण सना सुदीत लेकरा बाळात ,सणाचा आनंद घेत असतो मात्र आपले पोलीस बांधव ,लोकांना सणाचा आनंद मिळावा म्हणून ,ड्युटी वरती हजर असतो व आपले संरक्षण करत आसतो ,आज इतिहासात कधी ऐकलं नाही पोलिसांचा कधी संप झालेला ,का बरं पोलिस म्हणजे पण माणस च आहेत त्यांना नसतील का अडचणी त्यांचे नसतील का प्रश्न पण हे सगळ निमूट पणे सहन करत पोलीस बांधव आपल्या कर्तव्यावर हजर असतात ,ऊन ,वारा ,पाऊस ,अस्मानी संकट ,दहशतवादी हल्ले असो ,न डगमगता आपली ड्युटी बजावत असतात ,मान्य आहे काही बोटावर मोजण्या इतक्या पोलीस कर्मचार्यांचे चुका होत ही असतील पण त्यासाठी पूर्ण पोलीस खात्याला  बदनाम करणे चुकीचे आहे काही  ,लोक सगळ्या च  पोलिसांकडे बघताना  वाईट विचार करतात  परंतु पाच बोटे सारखी नसतात सगळेच पोलीस भ्रष्ट नसतात ,त्यांनाही  मन आहे ,मर्यादा आहे,कधी नाईलाजाने वरिष्ठांचे दबावात लोकंबद्दल कठोर निर्णय घ्यावे लागतात म्हनून ते वाईट नक्कीच नसतात ,आज देशासह राज्यात आपण बघत आहोत देशाचे राज्याचे लोकसंख्ये च्या मानाने पोलिसांची संख्या खूपच कमी आहे ,50 हजार ते एक लाख लोकांचे मागे 1 पोलीस ही अवसथा आहे ,त्यामुळे गुन्हेगारी वाढते आहे ,या सर्व गोष्टींना आळा घालायचं असेल तर

पोलीस महाभर्ती करून राज्यात पोलीसांची संख्या वाढवणे खूप गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या