पन्हळघर बुद्रुक येथे कृषी विभागामार्फत मार्गदर्शन शिबीर संपन्न.

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव : दि. २० - माणगांव कृषी विभागामार्फत  पन्हळघर  बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात येथे दि. 20 जानेवारी रोजी  शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य नाचणी  पिक याविषयी शेतकरी मार्दशन प्रशिक्षण  शिबीर घेण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये रेपोली संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.दडेमल यांनी नाचणी या पिकाचे महत्व शेतकऱ्यांना सांगितले. रोजच्या आहारात नाचणीचे फायदे उत्तम प्रकारे समजावून दिले. व त्याचबरोबर अत्याधुनिक पद्धतीने  कशी शेती  कडधान्य, भाजीपाला, कलिंगड, आंबा,काजू इत्यादी पिकांबाबत विस्तृत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यवेक्षक ससाणे  यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध  योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.मंडळ कृषि अधिकारी पडवळकर यांनी कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याविषयी माहिती दिली. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक श्रीम. ए.के. बळी यांनी केले. तसेच कार्यक्रमाला पन्हळघर बुद्रुक  माजी प्र. सरपंच राम भोस्तेकर, ,माजी उपसरपंच रामदास जाधव,माजी उपसरपंच रमेश भोनकर,संतोष मेरूकर,बबन शिंदे, प्रकाश जाधव, जनार्दन जाधव, राघो शिगवण, पोलीस पाटील सदानंद वातेरे,काशिराम नवाळे,अनंत शिंदे, नथुराम वातेरे, सखाराम भोस्तेकर,पोलिस पाटील रमेश जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी विजय जाधव तसेच बहुसंख्य शेतकरी व महिला वर्ग उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनंचे कृषी अधिकारी बळी यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न केल्याचे जाहीर केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या