उमरोलीत शेकाप, शिवसेनेला खिंडार; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

   

पोलीस प्रवाह न्यूज.

येत्या महिन्याभरातच उमरोली गावातील पाणी योजनेचे भूमिपूजन करणार- खा. सुनिल तटकरे

रायगड: दि. १४ - माणगांव तालुक्यातील साई पंचायत गणातील महत्वाची मानली जाणाऱ्या खरवली ग्राम पंचायत हद्दीतील मौजे उमरोली गावातील असंख्य ग्रामस्थ व महिलांनी दि. १३ नोव्हेंबर रोजी खा. सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी खा. सुनिल तटकरे म्हणाले की, उमरोली गावात होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन येत्या महिनाभरात करण्यात येईल. ग्रामस्थांवर अन्याय करणाऱ्यांची गय आता केली जाणार नाही. ग्रामस्थांनी आता निश्चित रहावे वटवृक्षाप्रमाणे खा. सुनिल तटकरे खंबीर उभा आहे. पालकमंत्री आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने विविध विकासकामे करण्याचे आश्वासन ही यावेळी खा. सुनिल तटकरेनी ग्रामस्थांना दिले.             

यावेळी मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, महीला अध्यक्ष संगीता बक्कम, पं. स. सदस्य शैलेश भोनकर, जेष्ठ नेते महादेव बक्कम, महाड पोलादपूर विधानसभा अध्यक्ष बाबू खानविलकर, नामदेव कासारे, सरपंच महादेव खडतर, काका नवगणे, विनोद सुतार, रवींद्र जाधव आदी मान्यवरांसह असंख्य उमरोली ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

या प्रवेशामुळे साई पंचायत समिती गण तसेच ग्रा. पं. खरवलीमध्ये राष्ट्रवादीचे ताकद वाढली असून आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे चित्र पहावयास मिळेल. उमरोली गावात आता फक्त राष्ट्रवादीच पॅटर्न चालेल.  शेकपमध्ये मनमानी व अन्यायग्रस्त कारभार चालतो. जि. प. शिवसेनेला निवडून देऊन एक रुपयाच काम उमरोली गावात करण्यात आले नाही. त्यामुळेच शेकाप व शिवसेनेला कंटाळून प्रवेश केल्याचे उमरोली ग्रामस्थांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या