प्रतिनिधी करमाळा
भक्तांच्या नवसाला पावणारी करमाळ्याची आई कमला भवाणी मातेचे महती सांगणारे 2 गाणी तयार करून आई कमला भवानी मातेची महती आपल्या गाण्यातून अवघ्या महाराष्ट्र नव्हे तर देश विदेशात पोहोचवनारे
करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र व पुणे येथील पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर यांना तमाम जगदंबा भक्त व जे एस सोशल युथ क्लब यांचे वतीने *करमाळा रत्न* पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ,
हा पुरस्कार करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार
श्री जयवंतराव (भाऊ ) जगताप यांचे हस्ते प्रदान करण्यात यावेळी मानाचा फेटा ,सन्मान चिन्ह तसेच करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार श्री जयवंत राव जगताप साहेब व करमाळा माढा मतदार संघाचे कार्यसम्राट विद्यमान आमदार श्री संजय ( मामा) शिंदे यांचे स्वाक्षरी असणारे सन्मान पत्र शाल ,श्रीफळ ,रोख रक्कम ,देऊन करण्यात आला करमाळ्याची आई कमलाभवाणी मातेचे महती सांगणारी दर्जेदार खूप श्रवणीय 2 गाणी प्रथमच तयार केली ,
हे दोन्ही गीत प्रचंड लोकप्रिय झाली, सुरेल आवाज ,अतिशय सुंदर संगीत व ठेका धरायला लावणारा ताल ,यामुळे दोन्ही गीत अल्पावधीतच लोकांचे घरोघरी पोहोचवली ,खूप श्रवणीय व दर्जेदार गीत असल्यामुळे ही गीत पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटत आहेत ,
यावेळी माजी आमदार जयवंतराव (भाऊ ) जगताप यांनी
श्री अवचर यांचे गाण्याचं विशेष कौतुक केले ,व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ,
यावेळी करमाळा तालुका मार्केट कमिटी चे नूतन सचिव श्री विठ्ठल (नाना) क्षीरसागर ,
आमदार संजय (मामा) शिंदे वाहतूक संघा चे सचिव व जे एस युथ चे अध्यक्ष श्री सुजित (तात्या) बागल ,जे जे मित्रपरिवार चे अध्यक्ष श्री रमेश वीर ,प्रशासन अधिकारी श्री अनिल बनसोडे साहेब ,गटसचिवांचे नेते बबनराव मेहेर साहेब ,श्री अनिल सुरवसे साहेब ,मुख्यध्यापक श्री दयानंद चौधरी ,
श्री दिगंबर रासकर ,सलमान शेख ,आदी मान्यवर उपस्थित होते , हा कार्यक्रम कोरोना चे नियमांचं पालन करत मोजक्या च निमंत्रित मान्यवरांचे उपस्थित सटवाई फार्म हाऊस येथे संपन्न झाला

0 टिप्पण्या